डहाणू पोलीस ठाण्यावर कम्युनिस्टांची धडक
By admin | Published: January 14, 2017 06:11 AM2017-01-14T06:11:02+5:302017-01-14T06:12:27+5:30
डहाणू येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चार सक्र ीय कार्यकत्यांवर डहाणू पोलिसांनी पालघर ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातून
डहाणू : डहाणू येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चार सक्र ीय कार्यकत्यांवर डहाणू पोलिसांनी पालघर ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातून सूड बुद्धीने बजावलेल्या हद्द परीच्या नोटीसा त्विरत मागे घेण्यात याव्या, इतर कार्यकत्यांवर टाकलेल्या केसेस मागे घेण्यात येऊन भाजपचे खंडणीखोर आमदार पास्कल धनारे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याची आमदारकी रद्द करा,आदी मागणीसाठी शुक्रवारी हजारो मार्क्सवाद्यांनी डहाणू पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला होता.
डहाणू पोलीस ठाण्यावर काढण्यात आलेल्या मोचामध्ये माकपचे केंद्रीय नेते कॉ. अशोक ढवळे ,माजी आमदार नरसय्या, आमदार जे.पी.गावित, महिंद्र सिंह, माजी खासदार लहानू कोम, कॉ.मरियम ढवळे, किसन गुजर, एम.एस.शैख, सुनील मालुसरे , डॉ.अजित नवले सामिल झाले होते. मोर्चाच्या निमित्ताने सकाळ पासूनच शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस व राज्य राखीव दलाच्या जवान तैनात असल्याने डहाणूला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मार्चाच्या वातावरणामुळे बाजारपेठा व मुख्य रस्त्यावरील दुकाने बंद ठेवणे व्यापाऱ्यांनी पसंत केले. तर रस्त्यावरही तुरळक वाहने दिसली.
दरम्यान लाल बावट्याच्या एका शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी गोयल मॅडम यांना निवेदन दिले. त्यानंतर के.टी.नगर येथे जाहीर सभा झाली. (वार्ताहर)