ठाणे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे धरणे; बेमुदत कामबंदचा इशारा

By सुरेश लोखंडे | Published: January 16, 2023 04:56 PM2023-01-16T16:56:50+5:302023-01-16T16:57:24+5:30

डॉक्टरांनी आज महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले.

Community Health Officers in Thane District protest; strike warning | ठाणे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे धरणे; बेमुदत कामबंदचा इशारा

ठाणे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे धरणे; बेमुदत कामबंदचा इशारा

googlenewsNext

ठाणे येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणात जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात जाऊन रूग्ण सेवा देणाºया समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन येथील आरोग्य विभागाच्या प्रांगणात धरणे आंदोलन केले. त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनुजकुमार जिंदाल यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळीस मान्य न झाल्यास २३ जानेवारीपासून बेमुदत राज्यव्यापी कामबंद आंदोलनात सहभागी होण्याचा इशाराही या डॉक्टरांनी प्रशासनाला दिला आहे.

जिल्ह्यातील या डॉक्टरांनी आज महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. या संघटनेचा आजचा हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम राज्यस्तरीय आहे. त्यास अनुसरून हे आंदोलन हाती घेतल्याचे येथील नेतृत्वकर्त्या डॉ. तेजस्वीनी सोनवणे यांनी लोकमतला सांगितले. प्रलंबित मागण्या वेळीच मान्य करून त्यानुसार सोयी सुवलती देण्यात याव्या अन्यथा आजच्या धरणे आंदोलनानंतर २३ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   

या डॉक्टरांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शासन सेवेत कायम करून गट व दर्जा देण्यात यावा, केंदाच्या मार्गदर्शन सुचनेनुसार ४० हजार रूपयेमानधानवाढ व अनुभव बोनस मिळावा. मुळ वेतनाच्या १० टक्के कामावर आधारित मोबदला द्यावा. जिल्हाबाह्य व जिल्हाअंतर्गत बदली करण्यात यावी.बढती देण्यात यावी. भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण मिळावे आदी मागण्या या डॉक्टरांनी धरणे आंदोलनाव्दारे लावून धरल्या आहेत.

Web Title: Community Health Officers in Thane District protest; strike warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे