बोईसरला३७५ आदिवासींचा सामूहिक विवाह
By admin | Published: May 24, 2017 12:49 AM2017-05-24T00:49:12+5:302017-05-24T00:49:12+5:30
आधार प्रतिष्ठान व शिवसेना पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी समाजातील गरीब, गरजू व दारिद्र्य रेषेखालील
पंकज राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : आधार प्रतिष्ठान व शिवसेना पालघर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत आदिवासी समाजातील गरीब, गरजू व दारिद्र्य रेषेखालील ३७५ वधू-वरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या धूम धडाक्यात बोईसरला संपन्न झाला. या सोहळ्यात पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागातील बहुसंख्य आदिवासी जोडपी सहभागी झाले होते.
या प्रसंगी खासदार राऊत यांनी मुलीच्या लग्ना करीता घेतलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात असे सांगून गोर गरीब अदिवासींकरीता आधार प्रतिष्ठान आयोजित करीत असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे कर्ज मुक्त लग्न व संसार सुखी होण्यास निश्चित मदत होईल अशी आशा व्यक्त करून या उपक्रमामुळे गोरगरीबांचे संसार फूलल्याचे गौरोदगार काढले.
आधार प्रतिष्ठानामार्फत वधूला साडी, मेकअप बॉक्स, पादत्राणे, वरांसाठी कपडे तसेच टॉवेल, चादर, बेड शीटस्, आणि संसारपयोगी भांडी पाहुण्याच्या हस्ते देण्यात आली.
आधार प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळयात आता पर्यंत २३०० जोडपयांच्या विवाह पार पडला असून सावकाराकडून कर्ज घेऊन लग्न करण्याच्या प्रवृत्तीस सामुदायिक लग्नाच्या माध्यमातून आळा बसून ते कुटुंब वेठबिगारीतून मुक्त होईल असे आधार प्रतिष्ठानचे सचिव जगदीश धोडी यांनी सांगितले.
बोईसरच्या इराणीवाडी मैदानावर आयोजिलेल्या या विवाह सोहळ्याला शिवसेनेचे उपनेते अनंत तरे, आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र सिंग, सचिव जगदिश धोडी, पालघर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधिक्षक बी. जी.यशोद, शिवसेना पालघर जिल्हाचे सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, युवसेना पालघर जिल्हा निरीक्षक केदार दिघे, शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण, माजी जिल्हा प्रमुख उदय बंधू पाटील व प्रभाकर राऊळ, आमदार अमित घोडा, बोईसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी फत्तेसिंग पाटील, पालघर जि. प. उपाध्यक्ष सचिन पाटील, उपजिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, पालघर जिल्ह्याच्या महिला संघटक ज्योती ठाकरे, युवासेनेचे पालघर जिल्हयाचे युवा अधिकारी अॅड. परीक्षीत पाटील, पालघर तालुका प्रमुख सुधीर तामोरे, पालघर पं. स.चे सभापती रवींद्र पागधरे, उपसभापती मनोज संखे, आधार प्रतिष्ठान चे पदाधिकारी प.स. सदस्य मुकेश पाटील, बोईसर शहर प्रमुख निलम संखे, आधार महेश जाधव, आंनद धोडी व अशोक भोईर आदि मान्यवर तसेच वधूवरांचे नातेवाईक तसेच त्यांचया गावातील अनेक वऱ्हाडी उपस्थित होते.