ती कंपनी भाजपच्या माजी मंत्र्यांच्या पतीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:15 AM2021-02-18T05:15:16+5:302021-02-18T05:15:16+5:30
मूळ ठराव बदलला असल्यासंदर्भात आपण कागदपत्रे जाहीर केली आहेत. आता महापौर नरेश म्हस्के यांनी दिवंगत आनंद दिघे यांची ...
मूळ
ठराव बदलला असल्यासंदर्भात आपण कागदपत्रे जाहीर केली आहेत. आता महापौर
नरेश म्हस्के यांनी दिवंगत आनंद दिघे यांची शपथ घेऊन आरोप खोटे असल्याचे
सिद्ध करावे. असे आव्हान वाघुले यांनी दिले आहे. मूळ ठराव तिर्था कंपनीचा
असताना सुवर्णा फायब्रेटिकचा प्रस्ताव कोणी घुसविला. सुवर्णा फायब्रेटिकचा
स्वतंत्र प्रस्ताव का आणला नाही, असा सवाल वाघुले यांनी केला.
..........
भाजपचे
नगरसेवक सुनेश जोशी आणि काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनीही इतर
ठिकाणीदेखील अशा पद्धतीने ठराव करावेत, अशी सूचना केली होती. त्या आशयाचे
पत्रही चव्हाण यांनी दिले होते. त्या अनुषंगाने ठराव केला आहे. परंतु,
कायदेशीर बाबी तपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले होते. तसेच भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनीही पत्र दिले होते. शिवाय ज्या कंपनीबाबत वाघुले बोलत आहेत, ती कंपनी भाजपच्या एका माजी
मंत्र्यांच्या पतीचीच आहे, कदाचित हे ते विसरले आहेत का?, किंवा त्यांचे
काही अंतर्गत वाद असतील तर अशा पद्धतीने त्यांनी ते काढू नयेत.
(नरेश म्हस्के - महापौर, ठाणे महापालिका)