ठाण्यात रिव्हॉल्व्हरची साफसफाई करताना गोळीबार; कंपनी मालकासह तिघे जखमी

By जितेंद्र कालेकर | Published: January 6, 2024 10:30 PM2024-01-06T22:30:31+5:302024-01-06T23:25:14+5:30

श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा: जखमींवर उपचार सुरु

Company owner and three injured in firing while cleaning revolver in Thane | ठाण्यात रिव्हॉल्व्हरची साफसफाई करताना गोळीबार; कंपनी मालकासह तिघे जखमी

ठाण्यात रिव्हॉल्व्हरची साफसफाई करताना गोळीबार; कंपनी मालकासह तिघे जखमी

ठाणे:  रिव्हॉल्व्हरची साफसफाई करतांना झालेल्या गोळीबारात कंपनी मालक मोहम्मद उमर शेख (५०, रा. लोकमान्यनगर, ठाणे) यांच्यासह बिपीन कुमार जयस्वाल (२१ रा. रुपादेवी पाडा, ठाणे) आणि राहूल कुमार जयस्वाल (२३, रा. वागळे इस्टेट, ठाणे) हे तिघेजण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांनी दिली.    

ठाण्यातील वागळे इस्टेट, रामनगर भागातील रोड क्रमांक २८ येथील  चामुंडा फॅब्रिकेटर्स अ ४१६ या गाळयातील कंपनीमध्ये ५.३० वाजण्याच्या सुमारास कंपनीचे मालक शेख हे त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरची साफसफाई करीत होते. त्याचवेळी त्यांच्याकडून चुकून एक राऊंड राऊंड फायर झाला . यामध्ये त्यांच्या स्वत:च्या डाव्या हाताच्या बोटांना तसेच तिचे उपस्थित असलेले बिपिन कुमार या कामगाराच्या उजव्या हाताला आणि  राहुल कुमार या अन्य कामगाराच्या हातालाही गोळी लागून ते जखमी झाले. गोळीबाराच्या घटनेनंतर तिघांनाही तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी तात्काळ वागळे इस्टेट परिमंळाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलिस आयुक्त  गजानन काब्दुले  आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शेख यांच्याविरुद्ध श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Company owner and three injured in firing while cleaning revolver in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.