विशेष लोक अदालतीत अपघातग्रस्तांना १० काेटी ७९ लाखांची भरपाई !
By सुरेश लोखंडे | Published: July 10, 2023 08:15 PM2023-07-10T20:15:15+5:302023-07-10T20:15:57+5:30
यासाठी मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाचे सदस्य एस. एन. शाह यांनी पॅनल प्रमुख म्हणून विशेष प्रयत्न केले.
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील प्रलंबित मोटार अपघात प्रकरणांसाठी विशेष लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. त्यात तब्बल १३० खटले निकाली काढण्ण्यात आले आहेत. या खटल्यांच्या सुनावणीव्दारे तब्बल दहा काेटी ७९ लाख ४५ हजारांची भरपाई संबंधीत अपघातग्रस्ताना मंजूर करण्यात आली आहे.
या विशेष लाेक आदालीतीसाठी वकील संघटना, पक्षकार, विधीज्ञ, इन्शुरन्स कंपन्या यांनी उत्तम प्रतिसाद दिला व १३० प्रलंबित मोटार अपघात दावे निकाली निघाले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली. अलिकडेच पार पडलेल्या या लोकअदालतीमध्ये मोटार अपघात दावा नुकसान भरपाई संबंधीत पिडीतांना रक्कम रूपये दहा काेटी ७९ लाख ४५ हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यातील एका दावरूात चोलामंडलम जनरल इन्श्युरन्स कंपनीकडून सर्वार्त जास्त ६३ लाख रूपये मंजुर करण्यात आले. या खालाेखाल गो डिजिट इन्श्युरन्स कंपनी ने ५० लाख आणि रॉयल सुंदरम जनरल इन्श्युरन्सने ४२ लाखांची रक्कम संबंधीत अपघात ग्रस्तासाठी मंजूर केली आहे.
यासाठी मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाचे सदस्य एस. एन. शाह यांनी पॅनल प्रमुख म्हणून विशेष प्रयत्न केले. ठाणे जिल्हा वकील संघटना व विशेषत: मोटार अपघात प्राधिकरणाचे सहकार्य लाभले. या विशेष लोकअदालतीमध्ये एकूण ४८ प्रकरणांत तंत्रज्ञानाचा वापर करून आभासी पध्दतीने तडजोड करण्यात आली. त्यामुळे परजिल्हा व परराज्यात असलेल्या पक्षकारांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रकरणात तडजोड कामी सहभाग घेता आला.