मृत रिक्षाचालक व प्रवाशाला दहा लाख रुपयांची भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:43 AM2021-04-23T04:43:06+5:302021-04-23T04:43:06+5:30

ठाणे : मासुंदा तलावाजवळ वृक्ष कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेला महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कारणीभूत असून, मृत रिक्षाचालक व प्रवाशाला दहा ...

Compensation of Rs. 10 lakhs should be given to the deceased autorickshaw driver and passenger | मृत रिक्षाचालक व प्रवाशाला दहा लाख रुपयांची भरपाई द्यावी

मृत रिक्षाचालक व प्रवाशाला दहा लाख रुपयांची भरपाई द्यावी

googlenewsNext

ठाणे : मासुंदा तलावाजवळ वृक्ष कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेला महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कारणीभूत असून, मृत रिक्षाचालक व प्रवाशाला दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे. वर्षातून किमान दोनवेळा वृक्षांच्या फांद्यांची छाटणी आवश्यक असताना, वृक्ष प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

मासुंदा तलावाजवळ बुधवारी रात्री कोसळलेल्या वृक्षाखाली सापडून रिक्षाचालक अरविंद राजभर (वय २८, रा. रामनगर, वागळे इस्टेट व प्रवासी चंद्रकांत केशव पाटील (वय ५७, रा. रबाळे, नवी मुंबई) यांचा मृत्यू झाला. शहरातील बहुसंख्य रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाल्यामुळे झाडांच्या मुळांना पसरण्यास जागा राहत नाही, असा खुलासा केला जातो. त्यामुळे अशा वृक्षांचे वर्षातून दोनवेळा सर्वेक्षण करण्याची गरज आहे. त्यानंतर धोकादायक, महाकाय वृक्ष व धोकादायक वृक्षांच्या फांद्या वेळोवेळी कापण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्याकडे वृक्ष प्राधिकरणाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच मासुंदा तलावाजवळची दुर्घटना घडली, असा आरोप त्यांनी केला.

या दुर्घटनेला सर्वस्वी महापालिका व वृक्ष प्राधिकरण जबाबदार आहे. या दुर्घटनेत दोघांचा बळी गेल्यामुळे दोन कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. या दुर्घटनेची जबाबदारी महापालिकेने स्वीकारून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चौकट

दोन दुर्घटनानंतरही

झोपी गेलेले वृक्ष प्राधिकरण!

ठाण्यात यापूर्वी वृक्ष कोसळून निष्पाप नागरिकांचे बळी गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. २०१७ मध्ये पाचपाखाडीत वकील किशोर पवार यांचा झाडाखाली सापडून मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीला सहानुभूती म्हणून महापालिकेने नोकरी दिली. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये ठाणे स्टेशनजवळ ताडाचे झाड कोसळल्यामुळे दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनांनंतरही वृक्ष प्राधिकरण झोपी गेलेले आहे. त्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याचा धोका आहे, असा आरोप वाघुले यांनी केला.

.........

वाचली

Web Title: Compensation of Rs. 10 lakhs should be given to the deceased autorickshaw driver and passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.