आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पदकांची लयलूट

By Admin | Published: May 11, 2017 01:49 AM2017-05-11T01:49:55+5:302017-05-11T01:49:55+5:30

मलेशियात झालेल्या चौदाव्या ओकिनावा गोजुरयू या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत कल्याण-डोंबिवलीतील मानसी प्रजापती,

The competition for medals in the International Karate Cup | आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पदकांची लयलूट

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पदकांची लयलूट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : मलेशियात झालेल्या चौदाव्या ओकिनावा गोजुरयू या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत कल्याण-डोंबिवलीतील मानसी प्रजापती, देवेश पाटील, एना डाइस आणि रोहित भोरे यांनी सुवर्ण, रजत आणि कांस्यपदके पटकावली.
शोतोकान फेड्रिकेशन कराटे कोचिंग क्लासच्या या विद्यार्थ्यांनी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ५ ते ७ मे या कालावधीत झालेल्या या स्पर्धेसाठी भारतासह नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, इंडोनेशिया, थायलंड, उज्बेकिस्तान, मलेशिया, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, सिंगापूर आदी १२ देशांतून ९०० खेळाडू सहभागी झाले होते. आठ विविध प्रकारांमध्ये चौघांनी विजेतेपद पटकावले आहे.
मानसीने आणि देवेश पाटीलने प्रत्येकी १ सुवर्ण, १ रजत तसेच रोहित भोरे आणि एना डाइसने प्रत्येकी १ सुवर्ण, १ कांस्यपदक पटकावले आहे. या चारही खेळाडूंना सावन ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: The competition for medals in the International Karate Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.