'राष्ट्राची उभारणी-पोलिसांची भूमिका’वर सात शाळांच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा!
By सुरेश लोखंडे | Published: December 18, 2022 06:16 PM2022-12-18T18:16:43+5:302022-12-18T18:16:43+5:30
निबंध स्पर्धेत ९२ आणि चित्रकला स्पर्धेसाठी ५५ जणांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पोलीस स्मृती दिनचे औचित्य साधून ‘राष्ट्राची उभारणी व पोलीसांची भुमिका’ या विषयावरील निबंध व चित्रकला स्पर्धेत शहरातील तब्बल सात शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत प्रथम,व्दितीय व तृतिया क्रमांका पटकवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुरस्कार वितरण समारंभ पूर्वक आज करण्यात आले.
पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस आयुक्तालयातील नामांकीत शाळेमध्ये इयत्ता ८ वी ते १० वी च्या विदयार्थ्यांकरीता या निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्याचे आदेश जारी केले होते. त्यास अनुसरून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या मानवी संसाधन विभागाने मोह विद्यालय, ठाणे पोलीस स्कुल, सहकार विद्यालय कळवा, म.न.पा. ठाणे, सरस्वती विद्यालय, राबोडी, युरो स्कुल कासारवडवली, व ठाणे म.न.पा. खोपट शाळा क्र. ३ आदी सात शाळेमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.
निबंध स्पर्धेसाठी ९२ तर चित्रकला स्पधेर्साठी एकूण ५५ विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी सर्व निबंध तपासण्याचे काम डॉ. अंजुषा पाटील गट प्रमुख तर चित्र तपासण्याचे काम किशोर किमी आदी गटप्रमुखांनी काम पाहिले. या निबंध व चित्रकला स्पर्धेतील प्रथम, द्वीतीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ १० विदयार्थ्यांची निवड करून त्यांना प्रमाणपत्राचे वाटप पोलीस आयुक्त कार्यालयाच्या ४ थ्या मजल्यावरील संकल्प हॉल मध्ये करण्यात आले. हा कार्यक्रम पोलीस उप आयुक्त रूपाली अंबुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यासाठी पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे आदींनी उपस्थित विदयार्थी व त्यांच्या पालकांना सखोल मार्गदर्शन केले.