ठाणे जिल्ह्यातील कांदळवन संरक्षणासाठी आता टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार!
By सुरेश लोखंडे | Published: July 18, 2023 05:48 PM2023-07-18T17:48:54+5:302023-07-18T17:49:03+5:30
कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तक्रारी स्विकारणे व तक्रारीचे निवारण होण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्याची सूचना नुकत्याच विभागस्तरीय बैठकीत करण्यात आली हाेती.
ठाणे : कांदळवनाचे प्रभावीपणे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी त्यासंदभार्तील तक्रार नाेंदवण्यासाठी आता १८००२२०००२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तक्रारी स्विकारणे व तक्रारीचे निवारण होण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्याची सूचना नुकत्याच विभागस्तरीय बैठकीत करण्यात आली हाेती. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कांदळवन संरक्षण व संवर्धन संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. कांदळवन संरक्षण व संवर्धनासाठी आता जिल्हास्तरावर तक्रारी दाखल करण्याची संधी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. त्यासाठी हा १८००२२०००२ टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील खाडी किनारी असणाऱ्या कांदळवन क्षेत्रात कांदळवनांची झाडे तोडली जात असतील, त्यावर भराव केला जात असेल, कांदळवन रोपांची कत्तल केली जात असेल, पाणथळ जागांवर भराव केला जात असेल तर तशी तक्रार करण्यासाठी या १८००२२०००२ क्रमांकावर ततकळ संपर्क सधण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.