आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 04:08 AM2017-08-10T04:08:03+5:302017-08-10T04:08:03+5:30
आरक्षण व इतर मागण्यांबाबत मराठा समाजातर्फे बुधवारी शांततेच्या मार्गाने मुंबईतील आझाद मैदानावर मूकमोर्चा पार पडला असतानाच, दुसरीकडे मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी एका तरु णीविरोधात येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : आरक्षण व इतर मागण्यांबाबत मराठा समाजातर्फे बुधवारी शांततेच्या मार्गाने मुंबईतील आझाद मैदानावर मूकमोर्चा पार पडला असतानाच, दुसरीकडे मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी एका तरु णीविरोधात येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे.
संबंधित तरु णी डोंबिवलीची असून, आरक्षणासंदर्भात तिने आक्षेपार्ह मजकूर ‘फेसबुक’वर टाकला आहे. याची माहिती मिळताच, कल्याणच्या शिवनिष्ठ तरु ण मंडळाचे अध्यक्ष आकाश शीतकर आणि मराठा समाजातील तरु णांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारींचे निवेदन दिले.
शांततेच्या मार्गाने प्रत्येक समाजाला मागण्या मांडण्याचा अधिकार आहे, तरी कोणी कोणत्याही समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे चुकीचे आहे, अशा व्यक्तींच्या या खोडसाळपणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी आमची मागणी असल्याचे शीतकर म्हणाले.