बनावट जेनेरिक आधार वेबसाईट युआरची निर्मिती करुन तिघांविरुद्ध तक्रार
By अजित मांडके | Published: August 21, 2023 06:27 PM2023-08-21T18:27:38+5:302023-08-21T18:27:42+5:30
कळव्यातील मनिषानगर येथील रहिवाशी देशपांडे यांनी त्यांची स्वाथ्य लाईफ सायन्स प्रा. लि. ही जेनेरिक आधार ही औषध विक्रीची कंपनी २०१९ पासून सुरु केली आहे.
ठाणे: बनावट जेनेरिक आधार वेबसाईट युआरएल निर्मिती करणाऱ्या तीन अज्ञात भामटयांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात राजेश देशपांडे यांनी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गतचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
कळव्यातील मनिषानगर येथील रहिवाशी देशपांडे यांनी त्यांची स्वाथ्य लाईफ सायन्स प्रा. लि. ही जेनेरिक आधार ही औषध विक्रीची कंपनी २०१९ पासून सुरु केली आहे. या कंपनीचे मुख्यालय ठाण्याच्या खोपट भागात आहे. राजेश देशपांडे हे व्यवस्थापकीय संचालक असून त्यांचा मुलगा अर्जून देशपांडे हा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्यांनी गुगल या वेबसाईटवर जेनेरिक आधार युआरएलमध्ये ग्राहकांना संपर्काकरिता काही मोबाईल क्रमांकही दिले आहेत. दरम्यान, १८ आॅगस्ट २०२३ रोजी कंपनीचे प्रादेशिक प्रमुख सुशांत कुमार यांच्याकडून राजेश देशपांडे यांना काही माहिती मिळाली. कोणीतरी अज्ञाताने जेनेरिक आधार याची आपली जेनेरिक आधार (अधिकृत मुळ) वेबसाईट युआरएल कॉपीराईट २०२१ ही २०२१ मध्ये बनविली आहे.
तशीच बनावट वेबसाईट तयार करुन मुळ अधिकृत वेबसाईटमधील आधार असे असून बनावट वेबसाईटमध्ये आधारमधील अक्षरांमध्ये चुकीची लिहिण्यात आली. गुगलवरील बनावट वेबसाईटमधील मोबाईल क्रमांकही बदलण्यात आले. हे सर्व केल्यानंतर बनावट वेबसाईटद्वारे फ्रेंचायझी फी आठ लाख रुपये आणि रिटेल फ्रेंचायझी फी एक लाख रुपये तसेच जीएसटीचे पैसेही स्वास्थ लाईफ सायन्स प्रा. लि. या खात्यात वळते करुन फ्रेंचायझी घ्या, असा बनावट मेल पाठवून फसवणूक केली. त्यामुळे देशपांडे यांनी बनावट वेबसाईट तयार करणाऱ्या, मोबाईल क्रमांक बदलणाऱ्या तसेच मेल पाठविणाऱ्या अशा तिघांविरुद्ध १९ आॅगस्ट रोजी तक्रार दाखल केली आहे.