आयुक्तांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By admin | Published: March 17, 2017 06:04 AM2017-03-17T06:04:45+5:302017-03-17T06:04:45+5:30
माहिती अधिकाराचे कार्यकर्ते व केडीएमसीविरोधात विविध प्रकरणांत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांनी केडीएमसी
कल्याण : माहिती अधिकाराचे कार्यकर्ते व केडीएमसीविरोधात विविध प्रकरणांत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांनी केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन दबाव आणत आहेत, अशी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सिद्धिविनायक सोसायटीत गोखले राहतात. या इमारतीच्या मालमत्ताकराची थकबाकी ५६ लाख रुपये दाखली आहे. त्यामुळे मालमत्ताकराच्या थकबाकीदारांच्या यादीत या इमारतीचे नाव आहे. परंतु, इमारतीचा प्रश्न मालमत्ता विभागाच्या करनिर्धारक व संकलक तृप्ती सांडभोर यांच्या कालावधीत निकाली निघाला आहे. परंतु, त्यांच्या इमारतीचे नाव थकबाकीरांच्या यादीत आहेत.
याबाबत संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी हात वर करत थकबाकीदारांच्या यादीशी आपला संबंध नाही. त्यासंदर्भात प्रभारी करनिर्धारक व संकलक अनिल लाड यांच्याशी संपर्क साधावा, असे गोखले यांना सांगितले. या बाबत लाड यांना गोखले यांनी विचारले असता आयुक्तांनी मला नोटीस काढण्यास सांगितले आहे, असे स्पष्ट केले. गोखले यांनी सांगितले की, थकबाकी नसताना मला केडीएमसीने नोटीस पाठवली आहे. तसेच थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)