हेल्पलाईनवर शहरात तर ग्रामीणमध्ये अ‍ॅपवर तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2015 01:49 AM2015-11-25T01:49:38+5:302015-11-25T01:49:38+5:30

शहर पोलीस आयुक्तालयातील महिला हेल्पलाईन क्रंमाकावर तक्रारदार महिलांचे फोन अधिक येत असून त्या तुलनेत ठाणे ग्रामीण हेल्पलाईनवर कमी कॉल येत आहेत.

Complaint in the city on helpline in rural areas | हेल्पलाईनवर शहरात तर ग्रामीणमध्ये अ‍ॅपवर तक्रारी

हेल्पलाईनवर शहरात तर ग्रामीणमध्ये अ‍ॅपवर तक्रारी

Next

पंकज रोडेकर, ठाणे
शहर पोलीस आयुक्तालयातील महिला हेल्पलाईन क्रंमाकावर तक्रारदार महिलांचे फोन अधिक येत असून त्या तुलनेत ठाणे ग्रामीण हेल्पलाईनवर कमी कॉल येत आहेत. मात्र, त्याचवेळी ग्रामीण पोलिसांच्या एफआयआर अ‍ॅपवर आलेल्या १५ हजारांहून अधिक कॉलमध्ये महिलांच्या तक्रारी लक्षणिय असताना शहर पोलिसांच्या अ‍ॅपवर महिलांवरील अन्यायाबाबत एकही कॉल आलेला नाही हे विशेष.
मुंबईतील महिलेने मोबाईलवरून हेल्पलाईनचा १०३ क्रमांक फिरवला तर ते कॉल ठाणे शहर व ग्रामीणच्या हेल्पलाईनवर येतात. ही सध्या या हेल्पलाईनबाबतची सगळ््यात मोठी तक्रार आहे. ती दूर करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.
हेल्पलाईन बरोबर ठाणे शहर पोलिसांनी ‘होम अ‍ॅप’ आणि ग्रामीणने ‘एफआयआर अ‍ॅप’वर सर्वच गुन्ह्यांसदर्भात तक्रार करण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येकांचा हाती स्मार्ट फोन असल्याने हेल्पलाईनबरोबर या अ‍ॅपचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहेत. राज्य शासनाने २०१२ मध्ये महिलांना भेडसावणाऱ्या समस्येसंदर्भात सहाय्य करण्याकरिता १०३ क्रमांकाची हेल्पलाईन २४ तास सुरु केली. त्यानुसार, या मोफत हेल्पलाईन क्रमांकामध्ये ठाणे शहरासाठी १०३ तर ग्रामीण पोलीस दलासाठी १०९१ क्रमांक सुरु आहे. शहर पोलीस दलाच्या हेल्पलाईनवर वर्षाला सुमारे २ हजारांहून अधिक महिलांनी संपर्क साधला आहे. यामध्ये निम्म्याहून अधिक मुंबईतील महिलांचा समावेश आहेत. तर ग्रामीण पोलिसांच्या १०९१ या हेल्पलाईनवर तोच प्रकार आहे. येथे वर्षाला साधारणता हजार ते पाचशे कॉल्स येत असून त्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांबरोबर अधिक कॉल्स हे मुंबई,नवी मुंबई, ठाणे या ठिकाणाचे आहेत. मुंबई किंवा अन्य परिसरातून येणाऱ्या कॉल्सबाबत गांभीर्यांने घेऊन त्याबाबत तेथील पोलिसांशी संपर्क केला जातो आणि ती तक्रार सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Complaint in the city on helpline in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.