आमदारांची पोलीस ठाण्यात तक्रार

By admin | Published: February 16, 2017 02:00 AM2017-02-16T02:00:13+5:302017-02-16T02:00:13+5:30

एका कार्यक्रमासाठी शहरात आलेल्या खा. विनय सहस्रबुद्धे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर थेट राष्ट्रवादीच्या आमदारांचा फोटो

Complaint of the MLA's Police Station | आमदारांची पोलीस ठाण्यात तक्रार

आमदारांची पोलीस ठाण्यात तक्रार

Next

आसनगाव : एका कार्यक्रमासाठी शहरात आलेल्या खा. विनय सहस्रबुद्धे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर थेट राष्ट्रवादीच्या आमदारांचा फोटो लावल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्वत:च नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर याप्रकरणी शहापूर पोलिसांकडे तक्रारदेखील केली आहे.
शहापुरात पशुसंवर्धनांतर्गत आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून खा. विनय सहस्रबुद्धे शहापुरात येणार होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ. पांडुरंग बरोरा यांच्याकडे होते. या कार्यक्रमाला खासदार येत असल्याने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वगताचे बॅनर शहापुरात लावले होते. मात्र, या बॅनरवर राष्ट्रवादीचे आ. बरोरा यांचादेखील फोटो वापरण्यात आला. भाजपाच्या बॅनरवर थेट राष्ट्रवादीच्या आमदाराचा फोटो वापरला गेल्याने तालुक्यात या बॅनरची चर्चा सुरू होती. हे प्रकरण आमदारांनी गांभीर्याने घेत याप्रकरणी थेट पोलिसांकडे तक्रार केली आहे. आपली परवानगी न घेता भाजपाच्या बॅनरवर हे फोटो लावल्याने आपल्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची भाजपाने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे बरोरा यांनी या तक्रारीत नमूद केले आहे. तक्रार दाखल केल्यावर त्यांनी कार्यक्रमाला मात्र उपस्थिती लावली. हा कार्यक्रम शासकीय असल्याने त्याला आपण उपस्थित राहिलो. मात्र, बॅनरप्रकरण हे चुकीचेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Complaint of the MLA's Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.