वेळेत वीज बिले वितरित न करणाऱ्या एजन्सीविरोधात वरिष्ठांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 12:26 AM2020-10-07T00:26:21+5:302020-10-07T00:26:25+5:30

उपकार्यकारी अभियंत्यांचे पत्र; ग्राहकांना सवलत मिळण्यात अडसर

Complaint to seniors against agency for non-delivery of electricity bills on time | वेळेत वीज बिले वितरित न करणाऱ्या एजन्सीविरोधात वरिष्ठांकडे तक्रार

वेळेत वीज बिले वितरित न करणाऱ्या एजन्सीविरोधात वरिष्ठांकडे तक्रार

Next

डोंबिवली : वीजबिलांचे सर्व ग्राहकांना वाटप न करणाºया आणि मीटर रीडिंगचे काम व्यवस्थित न करणाºया ‘महावितरण’च्या एमआयडीसी भागातील ठेकेदाराची तक्रार महावितरणच्या उपभियंत्यांनी १८ सप्टेंबर रोजी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्याची माहिती उघड झाली आहे.

मागील काही महिन्यांत वीज ग्राहकांना बिले मिळत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. शिवाय मीटर रीडिंग व वाढीव बिलाबाबत वीज ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. असे प्रकार महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग-३ येथे सर्वत्र होत आहेत. त्याबद्दल डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने सतत पाठपुरावा करून ग्राहकांच्या व्यथा महावितरणकडे मांडल्या होत्या. वारंवार तक्रारी येत असल्याने त्या अधिकाºयांनी आधी वास्तव जाणून घेतले. त्यानुसार संबंधित एजन्सीला वितरित करायला दिलेल्या बिलांपैकी ७० टक्के वीज बिले वितरित करण्यात येतात. उर्वरित ३० टक्के ग्राहकांना बिले वेळेत न मिळाल्याने त्यांना सवलतीच्या दरात बिले भरता येत नाहीत, उलट अनेकांना लेट फी मोजावी लागते, त्यामुळे ग्राहक त्रस्त असून त्यांच्या नाराजीला महावितरणला सामोरे जावे लागत आहे.

तरी वरिष्ठांनी संबंधित एजन्सीला समज द्यावी, अथवा कार्यवाही करावी, असे तक्रारवजा पत्र येथील अधिकाºयांनी महावितरणच्या कल्याण येथील कार्यकारी अभियंत्यांना लिहिल्याची माहिती असोसिएशनचे राजू नलावडे यांनी दिली.

Web Title: Complaint to seniors against agency for non-delivery of electricity bills on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.