ठाण्यात फोनवरही तक्रारींची ‘आपत्ती’

By admin | Published: July 3, 2017 06:32 AM2017-07-03T06:32:31+5:302017-07-03T06:32:31+5:30

पाऊस असो किंवा नसो ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन क क्षाचा फोन सतत खणखणतो आहे. गेल्यावर्षीच्या जूनपेक्षा यंदा तक्रारींत

Complaints of 'disaster' on phone in Thane | ठाण्यात फोनवरही तक्रारींची ‘आपत्ती’

ठाण्यात फोनवरही तक्रारींची ‘आपत्ती’

Next

पंकज रोडेकर/लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पाऊस असो किंवा नसो ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन क क्षाचा फोन सतत खणखणतो आहे. गेल्यावर्षीच्या जूनपेक्षा यंदा तक्रारींत भर पडली आहे आणि कॉलची संख्याही ६७५ वर गेली आहे.
गेल्या तीन महिन्यांत आपत्ती व्यवस्थापनाच्या हेल्पलाईनवर तक्रारीचे तब्बल एक हजार २०१ कॉल आले आहेत. यातील २१४ तक्रारी झाडे पडल्याच्या, तर ७७ पाणी तुंबल्याच्या होत्या. पालिकेत हा कक्ष सुरू झाल्यानंतर नागरिकांनाही त्याची सवय होते आहे. एखादी घटना घडली, प्रश्न-समस्या निर्माण झाली, तर ती लगेचच आपत्ती निवारण कक्षाला कळवण्याचे प्रमाण वाढते आहे. या कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींची नोंद ठेवण्यासाठी २० कॉलम तयार केले आहेत. त्यात आग, शॉर्टसर्किट, झाडे पडणे, फांदी तुटून पडणे, स्लॅब-प्लास्टर- घर -फुटपाथ, बिल्डींग-तिचा कॉलम, नाला, भिंत आदी पडणे, गॅस गळती, बोगस कॉल, मॉकड्रिल यांचा समावेश आहे. तक्रार आली की त्यानुसार त्यांची लगेचच वर्गवारी होते. तक्रार निवारणासाठी त्याचा फायदा होतो.
जुनमध्ये तक्रारींचा पाऊस
जून महिन्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या हेल्पलाईनवर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला. तर पावसाचे प्रमाण वाढल्याने १ जुलैला ४० विविध तक्रारी आल्या. जूनच्या तक्रारींत २३२ झाडे पडल्याच्या होत्या, ७७ पाणी तुंबण्याच्या तर इतर २४० होत्या.
एप्रिल-मेमध्ये ५०० तक्रारी
एप्रिल आणि मे महिन्यातही तक्रारींचा ओघ चांगला होता. त्या काळातही ४१ झाडे पडली. तर २६७ इतर तक्रारी, एक बोगस कॉल आला.
एकही जीवितहानी नाही
आतापर्यंत कक्षाकडे आलेल्या तक्रारीत काही प्रमाणात वित्तहानीचा तपशील आहे. पण एकही जीवितहानीची घटना नाही. किरकोळ जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे.
४० जणांची फौज तैनात
आपत्तीचा सामना करण्यासाठी ४० जणांची फौज तयार करण्यात आली आहे. यात आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह उर्वरित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
इतर तक्रारींचा आकडा ५१७
झाडे पडणे, आग याचबरोबर हेल्पलाईनवर येणाऱ्या तक्रारीत कावळा, मांजर कुत्रा अडकल्याच्या, रस्त्यावर आॅईल सांडल्याच्या ५१७ अन्य तक्रारीही होत्या.
यंदाच्या जूनमध्ये तक्रारींत वाढ
गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या जूनमध्ये तक्रारींचे प्रमाण २१६ ने वाढले. मागील वर्षापेक्षा यंदा ९० झाडे जास्त पडली, तर पाणी साठण्याच्या घटनांचे प्रमाणही ३६ ने वाढले. आगीचे प्रमाण सहाने वाढले आहे. तसेच, इतर तक्रारींचे प्रमाणही ५१ ने वाढले आहे.

पूरपरिस्थिती किंवा आपत्तीची स्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या मदतीसाठी पालिकेने २४ तास १८००२२२१०८ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे.
- संतोष कदम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठामपा.

Web Title: Complaints of 'disaster' on phone in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.