महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पैसे आकारले; भाजपाच्या नगरसेवकांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:40 PM2020-07-05T17:40:46+5:302020-07-05T17:40:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार झालेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या रुग्णांची ...

Complaints of extortion in Mahatma Phule Jan Arogya Yojana | महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पैसे आकारले; भाजपाच्या नगरसेवकांची तक्रार

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पैसे आकारले; भाजपाच्या नगरसेवकांची तक्रार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार झालेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या जाहीर करावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या योजनेतून हॉस्पीटलमध्ये दाखल झालेल्या अनेक लाभार्थी रुग्णांकडून हॉस्पीटलने जादा पैसे आकारल्याच्याही घटना घडल्या आहेत, याकडेही डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे.

महात्मा ज्योतिबा  फुले जन आरोग्य योजनेतून कोरोनाच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील ११ कोटींहून अधिक जनतेला मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मात्र, सद्यस्थितीत संबंधित योजनेचा तळागाळातील तसेंच सामान्य परिस्थितीतील रुग्णांना फायदा होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. 

या योजनेतून सध्या केवळ गंभीर स्थितीतील रुग्णांवरच मोफत उपचार केले जातात. काही वेळा या रुग्णांनाच काही रक्कम रुग्णालयात भरण्यास सांगितली जात आहे. ठाणे शहरातील काही रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखलच केले जात नाही, ही दुर्देवाची बाब आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत त्रूटी असल्याबरोबरच रुग्णालय प्रशासन मुजोर असल्याचे उघड होत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात कोरोनाचा संसर्ग झालेल्या ठाणे शहरातील अशा किती रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. किती रुग्णांना हॉस्पीटलला जादा रक्कम अदा करावी लागली, याची सविस्तर माहिती जाहीर करावी, अशी मागणी नगरसेवक डुंबरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Complaints of extortion in Mahatma Phule Jan Arogya Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.