महापालिका हद्दीतील नालेसफाई, रस्तेदुरुस्ती वेळेत पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:42 AM2021-04-23T04:42:53+5:302021-04-23T04:42:53+5:30

महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात गुरुवारी मान्सूनपूर्व आणि मान्सून कालावधीत करायच्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त ...

Complete non-cleaning and repair of roads in time | महापालिका हद्दीतील नालेसफाई, रस्तेदुरुस्ती वेळेत पूर्ण करा

महापालिका हद्दीतील नालेसफाई, रस्तेदुरुस्ती वेळेत पूर्ण करा

Next

महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात गुरुवारी मान्सूनपूर्व आणि मान्सून कालावधीत करायच्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, संजय हेरवाडे आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सध्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ही कामे लवकर पूर्ण करावीत़ तसेच, घनकचरा विभागाच्या वतीने प्रभाग समितीनिहाय साफसफाई करण्यासोबत शहरातील संपूर्ण नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. याबराेबरच शहरातील प्रभाग समितीनिहाय बेकायदा कामांची पाहणी करणे, त्याचबरोबर धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्या इमारतीतील रहिवाशांना इतरत्र स्थलांतरित करून सी १ व सी २ इमारती खाली करण्याचे आदेश त्यांनी सहायक आयुक्तांना दिले.

उघड्या चेंबरला झाकणे बसवणे, चर आणि खड्डे बुजविण्याच्या सूचना यावेळी सर्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळात मदत पथक घटनास्थळी पोहाेचावे यासाठी मनुष्यबळ व यंत्रणा विकेंद्रित करून ती विविध ठिकाणी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग असला तरी पावसाळ्यात साथीच्या रोगांचा पादुर्भाव होऊ नये यासाठी वेळोवेळी औषध फवारणी आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व आरोग्य केंद्रे या ठिकाणी आवश्यक औषधसाठा करून प्रतिबंधात्मक सुविधा निर्माण करण्याच्या सूचना दिल्या. ठाणे शहरातील आपत्कालीन विभाग २४ तास सुरू राहील याकडे विशेष काळजी घेण्यात यावी, तसेच अग्निशमन विभागानेही याबाबत सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले.

Web Title: Complete non-cleaning and repair of roads in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.