सुरू असलेली कामे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा - ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 05:38 PM2017-09-28T17:38:45+5:302017-09-28T17:39:00+5:30
शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबरोबरच सुरू असलेली कामे 15 ऑक्टोबर्पयत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. मात्र ही करताना कामाच्या दर्जामध्ये कुठलीही तडजोड करणार नाही असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.
ठाणे - शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबरोबरच सुरु असलेली कामे 15 ऑक्टोबर्पयत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. मात्र ही करताना कामाच्या दर्जामध्ये कुठलीही तडजोड करणार नाही असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.
बुधवारी सांयकाळी नागरी संशोधन केंद्र येथे तब्बल चार तास मॅरेथॉन बैठक घेतल्यानंतर त्यांनी हे आदेश संबधींत विभागांना दिले. नागरी कामांशी संबंधित सर्व अधिकारी आणि ठेकेदार यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी कळवा खाडी पूल, एकात्मिक नाले विकास, सिमेंट कॉंक्रीटीकरण, विकास आराखड्यातील रस्त्यांचे नुतनीकरण, युटीडब्लूटी पद्धतीने रस्त्यांची कामे, मिसिंग लिंक रोड, मॉडेल रस्ते आदी महत्वाच्या रस्त्याच्या कामाबरोबरच अनेक नागरी प्रकल्पांचाही आढावा घेतला.
दरम्यान ठाणो शहरामध्ये महापालिकेची कामे करणा:या ठेकेदारांना पुढच्या बैठकीत त्यांच्याकडे सुरू असलेल्या कामाचे सादरीकरण करण्याच्या सूचना देतानाच त्यांना यापुढे रोजच्या रोज कामाच्या सद्यस्थितीचा अहवाल महापालिकेस सादर करण्याचे निर्देशही दिले.
शहरात पोखरण रोड नं. 1, पोखरण रोड नं.2, स्टेशन रोड या महत्वाकांक्षी रस्त्यांसोबतच मॉडेल रोड, मिसिंग लिंक रोड, विकास आराखड्यातील रस्त्यांच्या रूंदीकरणाची आणि नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे वेळेत पुर्ण करतानाच ती दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, जेणोकरून त्याची लोकांकडून नोंद घेतली जाईल. रस्त्याची डागडुजी, रंगरंगोटी आदी छोट्या छोट्या कामातून चांगला फरक दिसू शकतो असे सांगून तुमच्या कामाची नोंद घेतली जाईल अशा पद्धतीची कामे करा असेही त्यांनी सांगितले. शिवाय सर्व अधिकारी आणि ठेकेदारांनी त्यांच्याकडील कामांना गती देवून ती सर्व कामे पूर्ण करून शहराला देखणो बनविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
ही दिवाळी तेजोमय व्हावी
ठाणो शहरात विविध रस्ते प्रकल्प हाती घेवून लोकांच्या अपेक्षा आपण उंचावल्या आहेत. बहुतांशी रस्त्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ही सर्व कामे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून लोकांची अपेक्षा पूर्ती करून ठाणोकरांची ही दिवाळी तेजोमय करावी असे भाविनक आवाहनही आयुक्तांनी या बैठकीत केले.