ठाणे जिल्ह्यातील १२ विधानसभांच्या मतदान केंदांमधील कामकाजाचे पहिले प्रशिक्षण पूर्ण
By सुरेश लोखंडे | Published: April 7, 2024 06:08 PM2024-04-07T18:08:57+5:302024-04-07T18:09:08+5:30
जिल्ह्यातील १२ मतदारसंघामधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कामाकाजाचे धडे घेतले.
ठाणे : जिल्ह्यातील लाेकसभा मतदारसंघ ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनच्या हाताळण्यापासून ते टपाली मतदान, टेबलांवरील हालचाली आदींच्या कामांपर्यंतच्या विविध कामांचे प्रशिक्षण आज जिल्ह्यात ठिकठिकाणी पार पडले. त्यासाठी जिल्ह्यातील १२ मतदारसंघामधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कामाकाजाचे धडे घेतले.
जिल्ह्याभरातील सहा हजार ५९२ मतदान केंद्रांवरील कामकाजासाठी तब्बल ४५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना या कामांचे प्रशिक्षण देण्याचे काम जिल्ह्या गेल्या दाेन दिवसांपासून सुरू झाले आहे. या पहिल्या प्रशिक्षणाचा रविवार शेवटचा दिवस हाेता. या शेवटच्या दिवशी १२ विधानसभा क्षेत्रातील कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले. तर त्या आधी शनिवारी सहा विधानसीाा क्षेत्रातील प्रशिक्षण ठिकठिकाणी घेण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लाेकसभा मतदारसंघाताील अधिकारी, कर्मचार्यांचे हे दाेन दिवशीय प्रथम प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे.
जिल्ह्याभरातील १८ विधानसभा मतदारसंघापैकी रविवारी १२ विधानसभामधील मतदान केंद्रांवर करण्यात येणाऱ्या कामकाजांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये ठाणे, मुंब्रा, ऐराेली, बेलापूर, डाेंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर,अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी प., शहापूर आणि भिवंडी ग्रा. आदी १२ विधानसभा मतदारसंघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज मतदान केंद्रांवरील कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जिल्ह्यात गेल्या दाेन दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रशिक्षणा दरम्यान सर्व केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांंना ईव्हीएम मशीन हाताळणी कशी करायचे यासह या मतदान केंद्रावर करायची कार्यवाही, टपाली मतदानाची माहिती अर्जामध्ये भरून घेणे, मतदान केंद्रावरील करायच्या कार्यवाही विषयीचे पहिले प्रशिक्षण आज पूर्ण झाले. याशिवाय टेबलनिहाय हजेरीपट तयार करण्याचे कामही यावेळी लक्षात आणून दिले आहे.