कुस्तीच्या सरावासाठी ठाण्यात लवकरच संकुल, एकनाथ शिंदे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 01:51 AM2020-01-21T01:51:17+5:302020-01-21T01:51:48+5:30
कुस्तीसाठी माती व मॅट असलेले स्वतंत्र संकुल उभारण्याचा मनोदय महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे व्यक्त केला आहे
ठाणे - ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा ही अतिशय लोकिप्रय स्पर्धा म्हणून ओळखली जाते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी बक्षीसामध्ये वाढ केली आहे. कुस्तीसाठी माती व मॅट असलेले स्वतंत्र संकुल उभारण्याचा मनोदय महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाकडे व्यक्त केला आहे. याबाबत आयुक्त संजीव जयस्वाल यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतली असून हे संकुल लवकरच उभारण्याची घोषणा नगर विकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी केली. यावेळी पुरूष गटात ठाणे महापौर चषकाचा मानकरी ठरलेल्या पैलवान मारु ती जाधव व महिला खुला गटातून विजेती ठरलेली सृष्टी भोसले यांना सन्मानित करण्यात आले.
महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ठाणे महापौर कला क्र ीडा महोत्सवातंर्गत ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धा आर्य क्र ीडा मंडळाच्या मैदानावर आयोजिली होती. या पारितोषिक वितरण सोहळ्यास महापौर नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी, माजी महापौर स्मीता इंदुलकर, नगरसेवक सुधीर कोकाटे आयुक्त संजीव जयस्वाल, क्र ीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थीत होते.
या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकाविणाऱ्या मारु ती जाधव यांना १,२५,००० चे रोख पारितोषिक तर दिव्तीय पारितोषिक सिकंदर शेख यांना ७५,००० रोख , तृतीय पारितोषिक सुहास गोडगे यांना ६०,००० रोख तर चतुर्थ पारितोषिक बाला रफीक शेख यांना ४०,००० रोख देवून गौरविण्यात आले.
महिला केसरी गट या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविणाºया सृष्टी भोसले यांना ७५,००० रोख द्वितीय पारितोषिक मनिषा दिवेकर यांना रोख ४०,०००, तृतीय पारितोषिक प्राजक्ता पानसरे यांना २०,००० रोख तर चतुर्थ पारितोषिक भाग्यश्री भोईर यांना १०,००० रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
महिला जिल्हास्तरीय स्पर्धेत ७० किलो वजनी गटात प्रथम पारितोषक रु ७५,०० रोख, द्वितीय पारितोषिक भाग्यश्री भोईर यांना ५०,०० रोख, तृतीय व चतुर्थ पारितोषिक विजया पाटील व भाग्यश्री गटकर यांना प्रत्येकी ३००० रोख देवून गौरविण्यात आले. विविध वजनी गटात झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना देखील पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले.