राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपास ठाणे जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 02:59 AM2018-08-08T02:59:24+5:302018-08-08T02:59:33+5:30
राज्य सरकारी कर्मचा-यांसह जिल्हा परिषद कर्मचाºयांनी तीन दिवसीय संपाची घोषणा केली आहे.
ठाणे : राज्य सरकारी कर्मचा-यांसह जिल्हा परिषद कर्मचाºयांनी तीन दिवसीय संपाची घोषणा केली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासह, तहसील आणि बांधकाम विभागात कर्मचाºयांअभावी शुकशुकाट होता. शिक्षण विभागासह सामान्य प्रशासन, समाजकल्याण आदी विभागांमध्ये कर्मचाºयांची उपस्थिती आढळली. पंचायत समित्यांतही शुकशुकाट होता. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेत संपाला कर्मचाºयांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. याशिवाय ठाणे शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमधील शिक्षकांनी संपात सहभाग घेतल्याचे निदर्शनास आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी पहिल्या दिवशी संपात सहभागी दिसून आले. कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशव्दारावर घोषणाबाजी केली. तहसील कार्यालयासह सार्वजनिक बांधकाम विभागातही ही स्थिती होती. संपकरी कर्मचाºयांचे नेतृत्त्व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी केले. पहिल्या दिवशी संपात सहभागी झालेले जि.प.चे कर्मचारी बुधवारपासून सहभागी होणार नसल्याचे ओंकार प्रणित जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे संपर्क सचिव शरद भिडे यांनी सांगितले.
दरम्यान, या कर्मचाºयांनी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात निदर्शने करून घोषणाबाजी केली. या संपात चतुर्थ श्रेणी सिव्हील हॉस्पीटल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ११२ चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि १३५ नर्सेस् सहभागी झाल्या.
>रुग्णसेवा सुरळीत : सातव्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या तीन दिवसीय संपात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांसह नर्सेस् सहभागी झाल्या होत्या. डॉक्टर या संपात सहभागी न झाल्याने आणि ६६ जणांना रोजंदारीवर तीन दिवसांसाठी रुग्णालयात पाचारण केल्याने मंगळवारी संपाच्या पहिल्या दिवशी रुग्णसेवा सुरळीत होती.