दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ठामपाने राबविली सर्वंकष स्वच्छता मोहीम; अतिरिक्त आयुक्तांचा समावेश
By जितेंद्र कालेकर | Published: June 7, 2024 06:02 PM2024-06-07T18:02:24+5:302024-06-07T18:03:22+5:30
अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडून साफसफाई अभियानाची पाहणी
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत शुक्रवारी सकाळी दिवा प्रभागात स्वच्छता करण्यात आली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शीळफाटा-महापे चौक येथील साफसफाई अभियानात सहभागी होऊन परिसराची स्वच्छता केली. तसेच, प्रभागातील स्वच्छता मोहिमेची पाहणीही केली.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार करण्यात येत असलेल्या या मोहिमेची सुरूवात शीळफाटा चौक स्वच्छ करण्याने झाली. रोडे यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार, सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.
या मोहिमेत, दिवा आणि परिसरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, चौक, रस्ते दुभाजक यांची स्वच्छता करण्यात आली. दुकानांसमोर रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी यावेळी दिले. या मोहिमेनंतर, दिवा, मुंब्रा आणि कळवा येथील नाले सफाईचीही पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केली.