पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘रस्ते सुरक्षा अभियाना’ची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:48 AM2021-02-17T04:48:21+5:302021-02-17T04:48:21+5:30
ठाणे : रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी, वाहनचालकांकडून नियमांचे पालन व्हावे, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने ठाणे ...
ठाणे : रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी, वाहनचालकांकडून नियमांचे पालन व्हावे, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत ‘सडक सुरक्षा आणि जीवन रक्षा’ हे अभियान गेले महिनाभर राबवले जात आहे. या मोहिमेचा सांगता सोहळा १७ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता आयोजित केला आहे.
खेवरा सर्कल येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात होणाऱ्या सोहळ्याला राज्याचे नगरविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहपोलीस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला, ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. बिपिन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.