कोंडेश्वरला जाणाऱ्या रस्त्याचे झाले काँक्रिटीकरण, सुकर होणार मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:40 AM2019-09-07T00:40:30+5:302019-09-07T00:40:54+5:30
पर्यटकांचा त्रास झाला कमी : पावसाळ््यात डांबरी रस्त्याची व्हायची चाळण, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात
बदलापूर : बदलापूरपासून काही अंतरावर असलेल्या कोंडेश्वर या पर्यटन स्थळापर्यंत पोहचण्याचा मार्ग हा अवघड होता. लहान डांबरी रस्ता असल्याने पावसाळ्यात या रस्त्याची पूर्ण वाताहत होत होती. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला असून कोंडेश्वर मार्गावरील रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील ७० टक्के रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने आता पर्यटकांसाठी कोंडेश्वरचा मार्ग सुकर झाला आहे.
बदलापूरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेला कोंडेश्वर धबधबा आणि त्या ठिकाणी असलेल्या महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने जात असतात. पावसाळळ्यात या रस्त्यावरून जाणाºया भाविक आणि पर्यटकांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. या मार्गावर भोज धरणावरील बंधाºयावर भिजण्यासाठी शेकडो पर्यटक येत असतात. तर त्याच्याच पुढे असलेल्या कोंडेश्वरच्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आणि त्या ठिकाणी असलेल्या निसर्गरम्य डोंगरावरील ओढ्यावर भिजण्याचा आनंद घेणाऱ्यांची संख्याही तेवढीच वाढली आहे. मात्र या मार्गावर नागरिकांची रहदारी वाढलेली असतानाही रस्त्याच्या मजबुतीकरणाकडे दुर्लक्ष होत होते.
रस्ता खराब होत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच वाहतूक कोंडीही होत होती. अनेक पर्यटक हे मिनीबस घेऊन या मार्गावर येत असल्याने खराब रस्त्यात बस अडकण्याचे आणि वाहतूककोंडी वाढण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे या भागातील सर्व महत्वाचे रस्ते काँक्रिटचे करण्याचा प्रस्ताव कथोरे यांनी मांडला होता. तो मंजूर होऊन काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले.
च्गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा काँक्रिटच्या रस्त्यामुळे पर्यटकांना कमी प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. खरवई नाका ते दहिवली या रस्त्यावर पालिका हद्दीतील रस्ता वगळता ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे.
च्दहिवली गावापर्यंत काँक्रिट रस्ता झाल्याने आता या मार्गावरील वाहतुकीची समस्या मिटली आहे. मात्र मूळ कोंडेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम यंदाच्या वर्षात पूर्ण करण्यात आले आहे. मंदिरपर्यंतचा रस्ताही काँक्रिटचा झाल्याने आता भाविकांना चिखलातून करावा लागणारा प्रवासही थांबला आहे.
च्खरवई नाका ते कोंडेश्वर रस्त्याचे काम हे अंमित टप्प्यात असून शेवटच्या टप्यात उर्वरित रस्त्याचेही काँक्रिटीकरण पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे कोंडेश्वरकडे जाणारा मार्ग आता पर्यटकांसाठी सोयीचा होणार आहे.