केडीएमटी नियंत्रण कक्षाची दुरवस्था कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 01:09 AM2020-07-27T01:09:34+5:302020-07-27T01:09:36+5:30

पाहणी झाली; पण कृती शून्य : दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा?

The condition of the KDMT control room persists | केडीएमटी नियंत्रण कक्षाची दुरवस्था कायम

केडीएमटी नियंत्रण कक्षाची दुरवस्था कायम

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेचे परिवहन विभागाचे डोंबिवली येथील नियंत्रण कक्ष दुरवस्थेच्या गर्तेत सापडले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये सभापती मनोज चौधरी यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. हा कक्ष बाजूकडील ग्रंथालयाच्या जागेत हलवण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. पण, वर्षभरानंतरही कक्षाची दुरवस्था ‘जैसे थे’ राहिली आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील दर्शनी भागातील अत्यंत चिंचोळ्या जागेत असलेल्या केडीएमटीच्या नियंत्रण कक्षातील भिंतींना तडे गेल्याने वरील छप्पर कधीही कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचाऱ्यांना बसायला पुरेशी जागा नाही. पावसाचे ठिबकणारे पाणी, डासांचा होत असलेला त्रास ही एकंदरीतच या कक्षाची अवस्था आहे. मागील वर्षी जुलैमध्ये सभापती मनोज चौधरी, सदस्य संजय पावशे आणि संजय राणे यांनी या कक्षाला भेट दिली होती. तेथील परिस्थितीबाबत त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. तत्काळ येथील कक्ष अन्यत्र हलवण्याचा निर्णय सभापतींसह सदस्यांकडून घेण्यात आला. पर्यायी जागा म्हणून त्यांच्याकडून ग्रंथालय कक्षाची पाहणी करण्यात आली होती. या कक्षात याआधी आधारकार्ड केंद्र उघडण्यात आले होते; पण कालांतराने ते बंद झाले.
कधी होणार निर्णय?
सध्या महापालिकेचा ‘फ’ आणि ‘ग’ असा संयुक्त आपत्कालीन कक्ष या जागेत आहे. बºयाचशा जागेचा वापर होत नसल्याने तेथे परिवहन नियंत्रण कक्ष चालू करण्यात यावा, असा निर्णय सभापती आणि सदस्यांकडून घेण्यात आला होता. पण, आजतागायत कोणतीही कृती घडलेली नसून कर्मचाऱ्यांच्या नशिबी दुरवस्था कायम राहिली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची सुविधा सुरू असल्याने या कक्षात एसटी महामंडळाचे कर्मचारी बसतात. तेही धोकादायक अवस्थेत आपले काम करीत आहेत. या कक्षाला लागूनच नाटकाच्या तिकिटाचे बुकिंग सेंटर आहे. तेही धोकादायक असून छताला असलेले प्लास्टर कोसळण्याची घटना नुकतीच घडली आहे. याठिकाणी सध्या केडीएमटीचे कर्मचारी बसतात.

Web Title: The condition of the KDMT control room persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.