मान्सूनपूर्व बांधकामांना दिली सशर्त परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:54 AM2020-04-29T02:54:08+5:302020-04-29T02:54:21+5:30

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मान्सूनपूर्व तातडीच्या कामांना बारा अटीशर्तीवर महापालिकांसह नगरपालिकांच्या कामांना परवानगी देण्याचे आदेश जारी केले.

Conditional permission given to pre-monsoon constructions, Collector's order | मान्सूनपूर्व बांधकामांना दिली सशर्त परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मान्सूनपूर्व बांधकामांना दिली सशर्त परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next

ठाणे : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मान्सूनपूर्व तातडीच्या कामांना बारा अटीशर्तीवर महापालिकांसह नगरपालिकांच्या कामांना परवानगी देण्याचे आदेश जारी केले.
या अटीशर्तीनुसार कोणत्याही नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, अर्धवट स्थितीतील जोत्यांचे, बेसमेंटचे बांधकाम, संरक्षक भिंत भूस्खलन प्रतिबंधक बांधकामे, आजूबाजूच्या इमारती, रस्ते यांना पाणी साचून धोकादायक ठरू शकतील अथवा डासांची निर्मिती वाढेल, अशाअर्धवट स्थितीतील बेसमेंटच्या भरावांच्या कामांना परवानगी देण्यात आलेली आहे.
लॉकडाउन अमलात आल्यामुळे अर्धवट स्थितीत राहिल्यास धोकादायक ठरु शकतील, अशी इमारतींच्या दुरुस्तीची बांधकामे, लॉकडाउन आदेश अमलात येण्यापूर्वी सुरु झालेली आणि आजमितीला अत्यावश्यक असलेली जलरोधक कामे, राहत्या इमारतींमधील आजमितीला अत्यावश्यक असलेली, आधीपासून सुरु झालेली परंतु अपूर्ण अवस्थेतील प्लास्टर, प्लंबिंग इत्यादी स्वरुपाची दुरुस्तीची कामे करण्यास परवानगी दिली आहे.
या कामांसाठी आवश्यक असलेली मालवाहतूक ही १७ एप्रिलच्या मार्गदर्शक सूचनांमधील तरतुदींना अधीन राहून करता येईल. त्यासाठी कामगार हे प्रतिबंधात्मक क्षेत्रामधून कामासाठी येणार नाहीत, याची दक्षता घ्या. कामगारांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करता येणार नाही. त्यांची राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणी करावी.
>कामासाठी लागू केलेल्या बारा अटी
बांधकाम ठिकाणी प्रत्येक कामगाराचे थर्मल स्कॅनिंग बंधनकारक.
आठवड्यातून दोन वेळा सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी.
शारीरिक क्षमता चांगली असेल, अशांनाच काम करण्याची मुभा.
आजारी कामगारांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची व्यवस्था. बांधकामाच्या जागेवर गर्दी टाळावी.
सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करावे.
हस्तांदोलन टाळणे.
कपडा अथवा मास्कचा वापर बंधनकारक. हाताने चेहरा, डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करु नये. मजुरांनी व इतर कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या वस्तू वापरू नयेत. मोबाइलवर बोलताना शक्यतो स्पीकर फोनचा वापर करावा.

दैनंदिन वापराच्या सर्व ठिकाणांचे ठरावीक कालावधीनंतर निर्जंतुकीकरण करावे.
बाहेरील व्यक्तींचा प्रवेश टाळण्यासाठी बॅरिकेडची व्यवस्था करावी लागेल.
सर्व परवानगींची प्रत स्थानिक पोलीस स्टेशनकडे जमा करावी.

Web Title: Conditional permission given to pre-monsoon constructions, Collector's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.