ठाणे शहरातील सर्व होल्डिंग्जचे स्ट्रक्चर आॅडिट करावे - मनविसेची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 03:43 PM2018-10-06T15:43:36+5:302018-10-06T16:06:16+5:30

पुणे येथे घडलेल्या घटनेत मनविसेने प्रशासनाचा निषेध केला असून ठाणे शहरातील होल्डिंग्जचे हटविण्याची मागणी ठाणे महापालिकेला केली आहे. 

To conduct all the structures of hoarding in Thane city - Manavese demand | ठाणे शहरातील सर्व होल्डिंग्जचे स्ट्रक्चर आॅडिट करावे - मनविसेची मागणी 

ठाणे शहरातील सर्व होल्डिंग्जचे स्ट्रक्चर आॅडिट करावे - मनविसेची मागणी 

Next
ठळक मुद्देठाणे शहरातील सर्व होल्डिंग्जचे स्ट्रक्चर आॅडिट करावे - मनविसेची महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे मागणीअतिक्रमण विभागाला कठोर पावले उचलण्याचे आदेश द्यावेत - किरण पाटील

ठाणे : पुणे शहरात घडलेली दुर्घटना ठाणे शहरात भविष्यात घडू नये याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शहरअध्यक्ष किरण पाटील यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे ठाणे शहरातील सर्व होल्डिंग्जचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याची मागणी केली आहे.

      पुणे शहरात घडलेली घटना अत्यंत वाईट असून या घटनेच्या पार्शवभूमीवर पाटील यांनी हि मागणी केली आहे. ठाणे शहर हे होर्डिंग्सचे शहर आहे असा आरोप करीत ते म्हणाले कि, वाढदिवस, मेळावा, एखादी नियुक्ती, सण - उत्सवाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्स सर्रास शहरात लावले जातात. ठिकठिकाणी पसरत चाललेल्याया होर्डिंग्सवर प्रशासनाचे नियंत्र नसल्याने या होर्डिंग्सचे जाळे पसरत चालले आहे. गेल्या काही वर्षांपासून शहराला होर्डिंग्सने विळखा घातला आहे. पुणे शहरात नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेनंतर भविष्यात अशी घटना ठाणे शहरात होऊ नये याकरिता काळजी घेतली पाहिजे. सध्या शहरात प्रत्येक चौका-चौकात लोखंडी होल्डिंग्ज आहेत. जाहिरात विभाग तसेच अतिक्रमण विभाग यांना सर्व होल्डिंग्जचे स्टक्चर ऑडिट करनेबाबत आदेश द्यावेत व अनधिकृत होल्डिंग्ज आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करावि अशा मागणीचे निवेदन पाटील यांनी आयुक्तांना दिले आहे. महापालिकेनी सर्वेक्षण करावे व धोकादायक होर्डिंग तात्काळ हटवावेत अशी मागणी करण्यात आला आहे. महापालिका जाहिरात विभाग व अतिक्रमण विभागाला कठोर पावले उचलण्याचे आदेश द्यावेत असे देखील पाटील यांनी नमूद केले आहे. 

Web Title: To conduct all the structures of hoarding in Thane city - Manavese demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.