बस सोडून गायब झाला कंडक्टर; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
By अजित मांडके | Published: October 25, 2023 05:27 PM2023-10-25T17:27:41+5:302023-10-25T17:28:23+5:30
मंगळवारी रात्री ठाणे - बोरिवली ही ठामपाची बस बोरीवलीवरून ठाण्यात येत होती. नितीन कंपनी स्टॉपवरच त्या बसचा कंडक्टर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना माझी ड्युटी संपली आहे.
ठाणे : मंगळवारी रात्री ठामपाच्या वातानुकूलित बसचा कंडक्टर हा शेवटचा स्टॉप येण्यापूर्वीच मधूनच अचानक गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या बसमधील प्रवाशांनी हा प्रकार मोबाईल कैद केला आहे. याबाबत चालकाला विचारणा केली असता, चालकाने 'ड्युटी हावर्स संपल्याने' कंडक्टर उतरून वागळे इस्टेटला गेल्याचे म्हटले. यावरून ठामपा परिवहन उपक्रममध्ये मनमानी सुरू असल्याचे सोशल मीडियावर व्हिडीओवरून समोर आले आहे.
मंगळवारी रात्री ठाणे - बोरिवली ही ठामपाची बस बोरीवलीवरून ठाण्यात येत होती. नितीन कंपनी स्टॉपवरच त्या बसचा कंडक्टर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना माझी ड्युटी संपली आहे. तिकीट घ्या आणि मग बसमध्ये चढा असे सांगत होता. बस सुरू झाल्यावर तो बसमध्ये न चढता निघून गेला. आतमध्ये बसलेल्या इतर प्रवाशांना कंडक्टर आहे की नाही हे माहितीच नव्हते. यावेळी एका प्रवाशाने नितीन कंपनी स्टॉप पूर्वी बसलेल्या काही प्रवाशांना कंडक्टर कुठे आहे याबाबत विचारणा केली. तेंव्हा मात्र शोधाशोध झाली.
ठाणे - बस सोडून गायब झाला कंडक्टर; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/G2HvPB70Hk
— Lokmat (@lokmat) October 25, 2023
एक प्रवासी म्हटला बहुतेक त्याचा स्टॉप आला असावा, दुसरा म्हटला त्याचे घर आले असेल. अन्य एका प्रवासीने चालक आणि कंडक्टर ही जय विरुची जोडी असावी असे म्हटल्याचे त्या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. अखेर शेवटचा स्टॉप आल्यावर कंडक्टर नसल्याने बेल कोण वाजवणार. तेव्हा चालकाने आपण पुढे यायचं बस थांबवली असती. पण, कंडक्टर कुठे गेला असा सवाल करताच चालकाने त्याची ड्युटी संपली तो वागळेला गेला असे सांगून मोकळा झाला. तसेच सर्व प्रवासी उतरताच बस घेऊन निघून गेला.
माझ्याकडे याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार अदयाप प्राप्त झालेली नाही.
भालचंद्र बेहेरे - व्यवस्थापक, ठाणे परिवहन सेवा