दुकाने उघडण्यासंदर्भात ठाणे महापालिकेची नियमावली गोंधळात टाकणारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:12 PM2020-06-05T12:12:46+5:302020-06-05T12:13:17+5:30
कोपरी -नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील दुकाने उघडण्यासंदर्भात काढण्यात आलेली नियमावली गोंधळ निर्माण करणारी असून याबाबत पोलिसांनी आक्षेप घेतला आहे.
ठाणे : प्रतिबंधित क्षेत्र वगळता आज ठाण्यातील सर्व दुकाने सशर्त उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोपरी -नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील दुकाने उघडण्यासंदर्भात काढण्यात आलेली नियमावली गोंधळ निर्माण करणारी असून याबाबत पोलिसांनी आक्षेप घेतला आहे.
कोर्ट नाका ते पुढे बाजारपेठेतील दुकाने सम-विषम तारखेनुसार उघडण्यास परवानगी देण्याबरोबर या अंतर्गत येणाऱ्या छोट्या मोठया गल्ल्यांचाही यामध्ये समावेश करणे अपेक्षित असताना तसे या सूचनांमध्ये करण्यात आले नसल्यामुळे आज दोन्ही बाजूची काही दुकाने उघडी करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी पालिका प्रशासनाला सुधारित नियमावली काढण्यास सांगितले आहे.
गेले दीड ते दोन महिने ठाण्यातील दुकाने पूर्णपणे बंद असल्याने अर्थकारण पूर्ण थांबले होते. आज अखेर दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आली असली तरी कोपरी आणि नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने या परिसरातील दुकाने सम विषम तारखेला उघडी करण्याची परवानगी देण्यात आली होती.
मात्र कोर्ट नाका ते पुढे बाजारपेठेपर्यंत दोन्ही बाजूनी दुकाने काही प्रमाणात उघडी करण्यात आली असून ठाणे महापालिकेची नियमावली गोंधळात टाकणारी आहे, असे ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही नियमावली नवीन काढण्यात यावी, अशी आपण ठाणे महापालिकेला सूचना करणार आहेत. जर असे झाले नाही तर सोशल डिस्टनसिंग पाळणे फार कठीण जाणार आल्याचेही सोमवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी बातम्या...
पाकचं नापाक कृत्य, आयएसआय एजंटकडून भारतीय राजदूतांचा पाठलाग!
मीरारोडमध्ये दुहेरी हत्याकांड; बारमधील दोन कर्मचाऱ्यांची हत्या
BSNLच्या ग्राहकांसाठी खूशखबर! 'या' प्लॅनमध्ये आता सप्टेंबरपर्यंत मिळणार 300GB डेटा