महापालिकेच्या पहिल्याच वेब महासभेत गोंधळ अन् केवळ गोंधळच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 08:14 PM2020-09-08T20:14:00+5:302020-09-08T20:14:16+5:30

नाराज नगरसेवकांनी केला सभात्याग, गोंधळात पुन्हा अडचणीचे विषयही झाले मंजुर

Confusion and only confusion in the first web general meeting of the corporation in thane | महापालिकेच्या पहिल्याच वेब महासभेत गोंधळ अन् केवळ गोंधळच

महापालिकेच्या पहिल्याच वेब महासभेत गोंधळ अन् केवळ गोंधळच

Next
ठळक मुद्देकोरोना,रस्ते,महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर चर्चा झालीच नाही

ठाणे  : मागील पाच महिने कोरोनामुळे महापालिकेची महासभा झाली नव्हती. परंतु त्यानंतर मंगळवारी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील खंडीत आणि मार्च महिन्याची रद्द झालेली आणि सप्टेंबरमहिन्याची ताजी महासभा एकाच दिवशी लावण्यात आली होती. त्यामुळे या महासभेत कोरोना, रस्त्यांची झालेली दुरावस्था, तीन महिन्यांचा मालमत्ता करमाफी, महापालिकेची विस्कटलेली आर्थिक स्थिती यावर चर्चा होईल अशी शक्यता होती. मात्र पहिल्याच वेब महासभेत नगरसेवकांना ना महापौर दिसत होते, ना अधिकारी त्यात विषय कोणता सुरु आहे, चर्चा काय करायची आणि एकाच वेळेस सर्वच नगरसेवक बोलत असल्याने या महासभेत पुर्ता गोंधळ उडाल्याचे दिसून आले.अखेर नेहमी प्रमाणो गोंधळात आणि अतिघाईत अडचणींच्या विषयांसह सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली.

तब्बल पाच महिन्यानंतर मंगळवारी ऑनलाईन महासभा घेण्यात आली. त्यामुळे या महासभेत कोरोनावर चर्चा करण्यासाठी नगरसेवक तयार होते, याशिवाय इतरही शहराच्या दृष्टीने महत्वाचे विषय चर्चेसाठी होते. गेल्या पाच महिन्यांत महासभा न झाल्यामुळे ठाणो शहरातील अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा होती. मात्र, महासभेने ती आशा फोल ठरली. महासभेमध्ये कोणते अधिकारी, कोणते नगरसेवक उपस्थित आहेत, याची माहिती मिळत नव्हती. अधिका:यांनी केलेले स्पष्टीकरण समजू शकले नाही. त्यामुळे या महासभेच्या आयोजनाचा मूळ उद्देशच फसल्याचे दिसून आले. शहरातील कोरोनाची स्थिती, मालमत्ता कर व पाणीपट्टी करामध्ये नागरिकांना दिलासा, महापालिकेची आर्थिक स्थिती आदींबाबत महासभेत खुलासा होण्याची अपेक्षा होती. मार्चच्या विषय पत्रिकेत लाखो ठाणोकरांच्या हिताच्या क्लस्टर विषयावर चर्चा होणार होती. मात्र, त्याबाबत काहीही निर्णय वा चर्चा झालेली नाही. त्यात महासभा सुरु असतांनाच इंटरनेट सेवाही पाच ते दहा मिनिटांसाठी बंद झाले होते. त्यामुळे नगरसेवकांमध्ये गोंधळ उडाला. विशेष म्हणजे एखाद्या विषयावर चर्चा करीत असतांना एक ा नगरसेवकाने बोलणो अपेक्षित असतांना अनेक नगरसेवक एकाच वेळेस बोलत असल्याने कोण काय बोलत आहे, याचाही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा तीन महिन्याची महासभा अवघ्या चार तासात गोंधळात संपविण्यात आली. यापुर्वी देखील गोंधळाचे विषय असल्यावर महासभा अशाच पध्दतीने गुंडाळली जात होती. आता वेबद्वारे घेण्यात आलेल्या तब्बल तीन सभा आणि त्यातील अडचणीचे विषयही मंजुर करण्यात आले.  

नगरसेवकांचा सभात्याग
प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांना बोलावण्यात आले होते. त्यामुळे ते सभागृहात उपस्थित होते. परंतु ठराविक नगरसेवकांनाच बोलविण्यात आल्याने काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. तर महासभेचे कामकाज चुकीच्या पध्दतीने सुरु असल्याचे सांगत मिलिंद पाटणकर, नारायण पवार, हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण आदींसह इतर तीन ते चार जणांनी ऑनलाईन महासभेत सभात्याग केला.

आधी चाचणी करा, मगा चर्चा

विधीमंडळाच्या धर्तीवर गडकरी रंगायतन किंवा डॉ. काशिनाथ घाणोकर नाट्यगृहात महासभा भरवावी. त्याआधी नगरसेवकांची कोरोना चाचणी करावी. त्यानंतर महासभा भरविल्यास महत्वपूर्ण विषयांवर चर्चा घ्यावी अशी मागणी सभात्याग केलेल्या नगरसेवकांनी व्यक्त केली. या संदर्भात नगरसेवक नारायण पवार यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे तशा स्वरुपाची मागणी देखील केली आहे. आता त्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन महासभा कुठे घ्यायची याचा निर्णय घेतला जाईल असे यावेळी महापौरांनी स्पष्ट केले.

Web Title: Confusion and only confusion in the first web general meeting of the corporation in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.