जीएसटीच्या रकमेसंदर्भातील आघाडीमधील संभ्रम दूर करावा- बाळा नांदगावकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 12:11 AM2020-11-01T00:11:22+5:302020-11-01T00:11:50+5:30

Bala Nandgaonkar : जीएसटीच्या रकमेविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे वेगवेगळ्य़ा रकमा सांगत आहेत. जीएसटीपोटी ३० हजार कोटी मिळणार आहेत, असे अर्थमंत्री सांगतात.

Confusion in the front regarding the amount of GST should be removed - Bala Nandgaonkar | जीएसटीच्या रकमेसंदर्भातील आघाडीमधील संभ्रम दूर करावा- बाळा नांदगावकर

जीएसटीच्या रकमेसंदर्भातील आघाडीमधील संभ्रम दूर करावा- बाळा नांदगावकर

Next

कल्याण : राज्याला केंद्राकडून जीएसटीपोटी किती रक्कम येणार, याविषयी महाविकास आघाडीत संभ्रम असल्याची टीका मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. 
जीएसटीच्या रकमेविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे वेगवेगळ्य़ा रकमा सांगत आहेत. जीएसटीपोटी ३० हजार कोटी मिळणार आहेत, असे अर्थमंत्री सांगतात. मुख्यमंत्री ३८ हजार कोटी येणार आहेत, असे सांगत आहेत. तर, कोणी सांगते ६० हजार कोटी रुपये मिळणार. परंतु, नक्की किती पैसे येणार, याबाबत संभ्रम असून, तो सरकारने दूर करावा, याकडे नांदगावकर यांनी लक्ष वेधले आहे. महाविकास आघाडीने एकत्रित येऊन आधी ठरवावे. राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी हजारो कोटी रुपये लागतात. सरकारच्या शिरावर हजारो कोटींचे कर्ज आहे. पैसै आणणार कुठून, असा प्रश्न आहे. एका बाजूने सगळे बंद आहे. हळूहळू सगळे व्यवहार सुरू करा. आम्ही म्हणत नाही की डोक्यावर कर्ज घ्या, असे ते म्हणाले. 
मनसे हा पक्ष ग्रास रूटवर उतरून काम करतो. कोरोनाकाळात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. स्वत:च्या खिशात हात घालून गरजूंना मदत केली. मनसेचा कार्यकर्ता सामान्यांच्या मदतीसाठी कुठेही कमी पडलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनतेने याची जाणीव ठेवून मनसेच्या पाठी उभे राहिले पाहिजे. कल्याण-डोंबिवली व ग्रामीण भागांत मनसेचे आमदार राजू पाटील हे चांगले काम करीत आहे. नाशिकला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे विकासकाम करून दाखविले, त्याची जाणीव जनतेने ठेवून मनसेला साथ दिली पाहिजे, अशी अपेक्षा नांदगावकर यांनी 
व्यक्त केली.

‘पाटील यांच्या हत्येचा योग्य तपास करा’
नांदगावकर यांनी मनसेच्या शिष्टमंडळासह अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी मनसेचे पदाधिकारी राकेश पाटील यांच्या हत्येचा योग्य प्रकारे तपास केला जावा, त्याचबरोबर उल्हासनगरातील मनसेचे कार्यकर्ते मनोज शेलार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींनाही अटक करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी 
केली आहे.

Web Title: Confusion in the front regarding the amount of GST should be removed - Bala Nandgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.