ठाणे जिल्ह्यात अनलॉक बाबत संभ्रम कायम, रविवारी अध्यादेश निघणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 10:17 PM2021-06-05T22:17:17+5:302021-06-05T22:17:37+5:30
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ठरविणार प्रत्येक महापालिकेचे स्तर
ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यातील विविध महापालिकेच्या अनलॉक संदर्भात शनिवारी दिवसभर संभ्रम कायम राहिला. अनलॉक संदर्भात प्रशासनाच्या वतीने कोणताही नवीन अध्यादेश काढण्यात आलेला नाही. राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात राज्यतील १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक जाहीर करण्यात आल्यानंतर सुरुवातीला पहिल्या टप्यात ठाण्याचे नाव देखील जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे ठाण्यात व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र शनिवारी ठाण्यासह इतर महापालिकांना आपण कोणत्या क्रमांकावर आहोत, याचा संभ्रम दिसून आला. त्यात आता ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शहराचा स्तर ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार रविवारी या संदर्भात जिल्हाधिका:यांकडे प्रत्येक महापालिकेचे आयुक्त आपला कोरोनाचा अहवाल सादर करणार असून त्यानंतरच प्रत्येक महापालिकेचा स्तर निश्चित केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेक द चेन च्या अंतर्गत आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनलॉकची प्रक्रि या सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ठाण्याचे नाव देखील जाहीर करण्यात आले होते. मात्र ठाण्याच्या रुग्णवाढीचा दर हा ५ टक्यांपेक्षा अधिक आहे. तसेच शनिवारी ठाणे हे थेट तिसऱ्या टप्प्यात फेकले गेल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील इतर शहरांबाबतही संभ्रम निर्माण झाला. कोणती महापालिका कोणत्या क्रमांकावर आहे, याची माहिती शनिवारी उशिरार्पयत समजू शकली नाही. त्यामुळे ठाणे अनलॉक होणार ही नाही याबात चर्चना उधान आले. व्यापारी वर्गात तर ठाणे अनलॉक होणार अशी बातमी वा:यासारखी पसरल्याने अनेकांनी संपूर्ण दिवसभर दुकाने उघडे ठेवण्याची तयारी देखील केली होती. मात्र शनिवारी रात्री उशिरा पर्यंत प्रशासनाकडून अनलॉक संदर्भात कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही .
हा संभ्रम दुर करण्यासाठी ठाणे महापालिकेकडून शनिवारीच नवीन अद्यादेश निघेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत बैठका सुरु असल्याने यावर तोडगा निघू शकला नाही. दरम्यान अनलॉक बाबत राज्याचे मुख्य सचिवांबरोबर चर्चा व्हिडीओ कॉन्सर्फन्स द्वारे चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी अनलॉकचा निर्णय घेण्याचे अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला घेण्यास सांगितले असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या सुत्रंनी दिली. त्यानुसार या विभागाचे प्रमुख जिल्हाधिकारी असल्याने या बाबतचा निर्णय आता रविवारी होणाऱ्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. रविवारी जिल्ह्यतील सर्वच महापालिका कोरोना अहवाल या बैठकीत सादर करणार आहेत. त्यानंतर प्रत्येक महापालिकेच्या स्तर निश्चित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ठाणे असो किंवा कल्याण डोंबिवली महापालिका नेमकी कोणत्या स्तरावर असणार आणि कोणत्या शहरात काय काय खुले होणार कसे र्निबध असणार याचा फैसला आता रविवारच्या सुटटीच्या दिवशी होणार आहे.
ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला महापालिकेचा स्तर निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार रविवारी आम्ही ठाणो शहराचा अहवाल त्यांच्या समोर सादर करणार आहोत. त्यानंतरच ठाण्याचा स्तर निश्चित होणार आहे. त्यामुळे या संदर्भातील आध्यादेश रविवारी काढला जाईल.
(डॉ. विपीन शर्मा - आयुक्त, ठामपा)