कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक सकारात्मक

By admin | Published: January 12, 2017 09:17 PM2017-01-12T21:17:57+5:302017-01-12T21:17:57+5:30

आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्यापेक्षा आघाडी करुन लढण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकमत झाले असून त्यानुसार गुरुवारी दुसरी बैठक

Congress and NCP's meeting positive | कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक सकारात्मक

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक सकारात्मक

Next

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 12 -  आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्यापेक्षा आघाडी करुन लढण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकमत झाले असून त्यानुसार गुरुवारी दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील 20 पॅनलवर सकारात्मक चर्चा झाली असून कळवा, मुंब्रा आणि शहरातील काही भाग वगळता 13 पॅनलवर चर्चा अद्याप शिल्लक आहे. परंतु यावर देखील योग्य तो तोडगा काढला जाईल असा विश्वास दोन्ही पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे.

पुढील महिन्यात ठाणो महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये आघाडी होणार आहे. त्यानुसार जागा वाटप आणि इतर पुढील चर्चेविषयीची बैठक गुरुवारी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या निवास्थनावर पार पडली. या बैठकीला कॉंग्रेसचे बाळकृष्ण पुर्णेकर, सुभाष कानडे, मनोज ओढे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर राष्ट्रवादीच्या वतीने शहर अध्यक्ष आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला आदी उपस्थित होते.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही चर्चा पार पडली असल्याचा दावा दोनही पक्षाकडून करण्यात आला आहे. त्यानुसार या बैठकीत, शहरातील 20 पॅनलवर यशस्वी चर्चा झाली असून कोणत्या जागेवर कोणी उभे राहायचे कोणता प्रभाग कोणासाठी अतिशय स्ट्रॉंग समजला जातो, त्यानुसार जागा वाटपही निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानुसार काही ठिकाणी राष्ट्रवादीचे तीन आणि कॉंग्रेसचा एक आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन आणि कॉंग्रेसचे दोन अशा प्रकारचे समीकरण तयार झाले असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सुरवातीपासून ज्या मतदार संघावर आघाडीचे घोडे अडून होते, त्यावर आजही चर्चा होऊ शकली नाही. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार होते. परंतु ते उपस्थित न राहू शकल्याने आता कळवा, मुंब्य्राची चर्चा शुक्रवारी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. एकूणच 20 पॅनलची सकारात्मक चर्चा झाली असून 13 पॅनलवर अद्यापही चर्चा होणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे यामध्ये ठाण्यातील देखील काही पॅनलचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.  
 
- आघाडी बाबत निश्चित झाली असून जागांचे वाटपही निश्चित झाले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आघाडीनेच आम्ही समोरे जाणार आहोत. 
- मनोज शिंदे, शहर अध्यक्ष,
ठाणे शहर कॉंग्रेस
 
आघाडी बाबत सुरवातीपासून सकारत्मक चर्चा सुरु असून आता ही चर्चा पुढे सरकली आहे. काही जागांचा तिडा सुटणो शिल्लक असून शुक्रवारी त्यावर निर्णय होईल.
- आनंद परांजपे, शहर अध्यक्ष
राष्ट्रवादी

 

Web Title: Congress and NCP's meeting positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.