काँग्रेसने आघाडीचा धर्म मोडला
By admin | Published: April 6, 2016 04:09 AM2016-04-06T04:09:44+5:302016-04-06T04:09:44+5:30
स्थायी समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजपा युतीत तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली असताना शिवसेनेने भाजपाला दिलेला शब्द पाळला.
मीरा रोड : उत्तन येथील घनकचरा प्रकल्प बंद पडल्याने प्रक्रि या केल्याविनाच कचरा टाकणारी मीरा-भार्इंदर महापालिका कात्रीत सापडली आहे. सुका व ओला कचरा वेगळा करण्याचे आवाहन करण्यापाठोपाठ आता शहरात चार ठिकाणी छोटेछोटे घनकचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेच्या विचाराधीन आहे. त्यासाठी उत्तन वगळता अन्य ठिकाणी मलनि:सारण केंद्रातील जागा निवडण्याचे काम सुरू आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेला उत्तनच्या धावगी येथे घनकचरा प्रकल्पासाठी मिळालेल्या विनामूल्य सरकारी भूखंडावर मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या आशीर्वादाने अतिक्र मण झाले आहे. तर, पालिकेने प्रकल्पासाठी नियुक्त केलेला हेंजर बायोटेक हा सपशेल अपयशी ठरलेला कंत्राटदार दोन वर्षांपूर्वीच आपला गाशा गुंडाळून निघून गेला आहे. पालिका सध्या शहरातील रोजचा सुमारे ४०० टन कचरा कोणत्याही प्रक्रि येविनाच टाकत असल्याने हरित लवाद व उच्च न्यायालयाने पालिकेला चांगलेच फटकारले आहे.
न्यायालयाच्या आदेशाने पालिकेने आता आयआयटीला सल्लागार म्हणून नियुक्त केले असून त्यांचा अहवाल अद्याप आला नसला तरी ओला व सुका कचरा वेगळा गोळा करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायही नाही. पालिकेने सकवार येथे कचऱ्यातून वीजनिर्मितीचा प्रकल्प प्रस्तावित केला असला तरी स्थानिक विरोध पाहता तो कधी सुरू होईल, याची शाश्वती पालिकेलाही नाही. तर, वसई-विरार महापालिका व तळोजा येथील सामायिक कचरा प्रकल्पात सहभागी होण्याची पालिकेची तयारी असली तरी उत्तन येथील कचरा व रोज नव्याने निर्माण होणारा कचरा यावर प्रक्रि या करणे पालिकेला बंधनकारक आहे.