एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाविरोधात ठाण्यात काँग्रेसची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 05:50 PM2020-02-24T17:50:53+5:302020-02-24T17:51:15+5:30
संविधानाने दिलेले एससी, एसटी, ओबीसी आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजपा सरकार प्रत्यक्षात अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. अ
ठाणे: संविधानाने दिलेले एससी, एसटी, ओबीसी आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजपा सरकार प्रत्यक्षात अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सदर ठरावाला विरोध करून एससी, एसटी, ओबीसीच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या आरक्षण विरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग अध्यक्ष प्रमोद मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे, ठाणे काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे, काँग्रेस एस सी विभाग अध्यक्ष महेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी बाबासाहेब आंबेडकर पुतळा कोर्ट नाका येथे धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी निदर्शनानंतर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस सुमन अग्रवाल, प्रदेश सचिव के वृषाली, प्रदेश सदस्य मोहन तिवारी, जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, सेवादल अध्यक्ष शेखर पाटील, युवक काँग्रेसचे नेते महेश पाटील व स्वप्नील भोईर, महिला अध्यक्षा शिल्पा सोनोणे, एसटीविभाग अध्यक्ष विश्वनाथ किरकिरे, प्रदेश ओबीसी सरचिटणीस कोकण प्रभारी रवींद्र परटोले व कृष्णा भुजबळ प्रदेश सदस्य राम भोसले, सुखदेव घोलप, डॉ जे. बी. यादव, ब्लॉक अध्यक्ष संदीप शिंदे, राजू शेट्टी, विनय विचारे, गफूर रुमानी, शहर पदाधिकारी विजय बनसोडे, सुनील कदम, रमेश इंदिसे, महेंद्र म्हात्रे, धर्मवीर मेहरोल, रवी कोळी, गिरीश कोळी, स्वप्नील कोळी, मिलिंद कोळी, माधुरी शिंदे, नाना कदम, मार्शल पन्हाळकर, प्रसाद पाटील, जालिंदर ससाणे, राठोड, तानाजी सूर्यवंशी, राधेश्याम हरिजन, प्रमोद गांधी, रामचंद्र कदम, ओबीसी पदाधिकारी श्रीकांत गाडीलकर, संदीप यादव, जयनारायण गुप्ता, गणेश गावडे, उमेश सिंग, वीरेंद्र गुप्ता माजी नगरसेविका शीतल आहेर, आशा सुतार, माजी नगरसेवक सुरेश जाधव मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.