काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:49 AM2021-09-07T04:49:17+5:302021-09-07T04:49:17+5:30
मुरबाड : काँग्रेस पक्षाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दयानंद चोरघे यांनी मुरबाड तालुक्यात दोन दिवस दौरा काढून जुन्याजाणत्या ...
मुरबाड : काँग्रेस पक्षाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दयानंद चोरघे यांनी मुरबाड तालुक्यात दोन दिवस दौरा काढून जुन्याजाणत्या आणि अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या वेळी त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय हाेण्याचे आवाहन केले. चाेरघे यांच्या या दाैऱ्यामुळे एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या मुरबाड तालुक्यात पुन्हा काँग्रेसचे वर्चस्व निर्माण हाेण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी शनिवारी आणि रविवारी या दाैऱ्याचे आयाेजन केले हाेते. या वेळी त्यांच्यासाेबत शहापूर तालुकाध्यक्ष महेशकुमार धानके, जिल्हा सरचिटणीस कृष्णकांत तुपे, कल्याण (ग्रा.) तालुकाध्यक्ष परशुराम पितांबरे, ओ.बी.सी. प्रदेश सरचिटणीस रवींद्र परटोले, जिल्हा उपाध्यक्ष संजय शेलार, महिला जिल्हाध्यक्ष संघजा मेश्राम, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे, ओ.बी.सी. जिल्हाध्यक्ष दिनेश सासे, कामगार नेते दादा पाटील, लक्ष्मण कुडव, संजय जाधव, पुंडलिक चहाड, लक्ष्मण घरत, देवेंद्र भेरे, रोहित प्रजापती आदी पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्हा काँग्रेस पक्षाचा बाल्लेकिला होता. मात्र, कलहात काँग्रेसची वाताहत झाली असून पक्ष नावापुरताच शिल्लक राहिला आहे. मुरबाड तालुक्यात नगण्य असलेल्या या पक्षाची जिल्ह्यातील धुरा दयानंद चोरघे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाकडे आल्याने कार्यकर्त्यांत नवचैतन्य पाहायला मिळत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले चाेरघे हे त्या पक्षाच्या ध्येयधाेरणांना कंटाळून पुन्हा स्वगृही परतले आहेत. महिला तालुकाध्यक्ष संध्या कदम, जयवंत पवार, गुरुनाथ पष्टे, शहर अध्यक्ष शुभांगी भराडे, अनिल चिराटे, तानाजी घागस, गणेश देशमुख, नेताजी लाटे, सुनील साबळे, सर्व गणप्रमुख, तालुका पदाधिकारी व असंख्य पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.