काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी महसूलमंत्र्यांकडे मांडल्या नागरी समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:43 AM2021-09-18T04:43:10+5:302021-09-18T04:43:10+5:30

भिवंडी : राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी ...

Congress district president presented civic issues to the revenue minister | काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी महसूलमंत्र्यांकडे मांडल्या नागरी समस्या

काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी महसूलमंत्र्यांकडे मांडल्या नागरी समस्या

Next

भिवंडी : राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी गुरुवारी मंत्रालयात भेट घेऊन जिल्ह्यातील विविध समस्यांवर चर्चा केली. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीटंचाई, कोरोनावरील उपाययोजना, नागरी आरोग्य समस्या अशा विविध विषयांवर चर्चा केली. ठाणे जिल्ह्यात काँग्रेस अधिक ताकदवान होण्यासाठी युवकांचे पक्षांतर्गत मेळावे आयोजित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी चोरघे यांनी थोरात यांच्याकडे केली.

एकेकाळी ठाणे जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात काँग्रेसला घरघर लागून काँग्रेसचा प्रभाव कमी झाला. त्यामुळे काँग्रेसने नागरिकांशी संपर्क वाढवून, विकासकामांना प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवावा, असे मत चोरघे यांनी व्यक्त केले. थोरात यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या विषयांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे व ठाणे जिल्हा काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले.

...........

वाचली.

Web Title: Congress district president presented civic issues to the revenue minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.