भिवंडीमध्ये काँग्रेसचा ‘एकला चलो रे’ नारा !
By admin | Published: March 30, 2017 06:27 AM2017-03-30T06:27:15+5:302017-03-30T06:27:15+5:30
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या एकमेव महापालिकेकडून काँग्रेस पक्षाला आता अपेक्षा उरल्या आहेत
पंकज रोडेकर / भिवंडी
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या एकमेव महापालिकेकडून काँग्रेस पक्षाला आता अपेक्षा उरल्या आहेत. त्यातच या महापालिकेत नंबर वन असलेल्या काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून आघाडीऐवजी ऐकला चलो रे! असा सूर उमटत
आहे. तर, निवडणुकीची कोणतीही घोषणा झाली नसताना, भिवंडीतून ३०० हून अधिक जण पक्षाच्या तिकीटीवर निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भिवंडी महापालिकेत निवडून आलेल्या सदस्यांचा (लोकप्रतिनिधी) कालावधी जून महिन्यात संपत आहेत. त्यानुसार येथे मे महिन्याच्या अखेर निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार, राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आयाराम आणि गयाराम यांची या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती ठाणे असो वा मुंबई येथे केविलवाणी झाली आहे. मात्र, भिवंडीत काँग्रेसने जिल्ह्यातील इतर निवडणुकांमधील पाठीमागे लागलेला डाग पुसून टाकण्यासाठी आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यानुसार, चाचपणी करण्यासाठी किती जण इच्छुक काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी अर्ज वाटप केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानुसार, जवळपास ३०० हून अधिक जणांनी अर्ज नेले आहेत. त्यामधील २५० जणांनी परत अर्ज भरूनसुद्धा सादर केले आहेत. हा प्रतिसाद पाहून काँग्रेस प्रदेशापातळीवरून नियुक्त केलेल्या निरीक्षकांमार्फत येत्या, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या मुखालती घेऊन ते किती सक्षम आहेत हे पाहिले जाणार आहे.
ठाणे, उल्हासनगर महापालिकेपाठोपाठ भिवंडीतील आगामी निवडणूकही चार जणांच्या पॅनल पद्धतीने होणार आहे.
बारकावे तपासणार
मुलाखतीच्या माध्यमातून बारकावे पाहण्यात येणार आहेत. याचदरम्यान, काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा ‘एकला चलो रे’ असा सूर असल्याने आघाडी करायची की नाही, जर करायची तर कुणाशी करायची. याबाबत रणनिती आखली जाणार आहे. नगरसेवकांची संख्या कशी वाढवता येईल, याकडे लक्ष देत काही धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत.