‘२०१९ ला काँग्रेसचे सरकार’
By admin | Published: July 17, 2017 01:00 AM2017-07-17T01:00:09+5:302017-07-17T01:00:09+5:30
जनतेला आजच्या कठीण परीस्थितीतुन कॉग्रेसच बाहेर काढू शकते म्हणून इतर पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या अपेक्षेने व संख्येने कॉग्रेस
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : जनतेला आजच्या कठीण परीस्थितीतुन कॉग्रेसच बाहेर काढू शकते म्हणून इतर पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या अपेक्षेने व संख्येने कॉग्रेस पक्षात येत असून दोनहजार एकोणिसच्या लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पुन्हा कॉग्रेसच निवडून येईल असा आशावाद माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी व्यक्त केला. बोईसर येथे कॉग्रेस कार्यकर्ता मिळावा आणि पक्ष प्रवेशाच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वेगवेगळ्या पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी कॉगं्रेस पक्षात प्रवेश केला.
या कार्यक्र मात माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी सद्या महीला, अल्पसंख्य, दलीत, यात्रेकरु, शेतकरी, व्यापारी, कामगार कोणीही सुरक्षित नसल्याची टिका गावित यांनी केली. जिल्हा अध्यक्ष केदार काळे यांनी बोईसर व परीसराचे नागरीकरण माठ्या प्रमाणावर झाले असून बोईसर नगरपरिषद झालीच पाहीजे अशी मागणी केली. तर संगीता धोंडे, सुदर्शना कौशिक, आनंद दुबे यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्र मास जिल्हा प्रभारी यशवंत हपे, विजय पाटील, बाळकृष्ण पुर्णेकर, नगरसेविका डॉ. उज्ज्वला काळे, रुतिका कोंडेकर, राजश्री आहीरे, सचिन शिंगडा, मनिशा सावे, हनुमान सिंग ,अरविंद क्षत्रिय, संदिप मेणे आदी उपस्थित होते.