ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त उल्हासनगरात काँग्रेसची क्रांती ज्योती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 05:31 PM2021-08-09T17:31:13+5:302021-08-09T17:31:25+5:30

 स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे व्यर्थ ना हो बलिदान कार्यक्रमा अंतर्गत सोमवारी सकाळी नेहरू चौक ते गांधी भवन क्रांती ज्योत रैली काढण्यात आली.

Congress Kranti Jyoti Rally in Ulhasnagar on the occasion of August Revolution Day | ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त उल्हासनगरात काँग्रेसची क्रांती ज्योती रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त उल्हासनगरात काँग्रेसची क्रांती ज्योती रॅली

googlenewsNext

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : व्यर्थ ना हो बलिदान अभियान अंतर्गत व ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने नेहरू चौक ते गांधी भवन दरम्यान क्रांती ज्योती रॅली काढण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहून यावेळी झेंडावंदन करण्यात आले.

 स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे व्यर्थ ना हो बलिदान कार्यक्रमा अंतर्गत सोमवारी सकाळी नेहरू चौक ते गांधी भवन क्रांती ज्योत रैली काढण्यात आली. पक्षाच्या गांधी भवन येथे पक्ष पदाधिकारी, विविध आघाड्या व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींच्या उपस्थितीत शहराध्यक्ष रोहित साळवे यांच्या हस्ते झेंडावंदन केले. त्यानंतर भारताचा स्वतंत्र लढा या विषयावर गांधी भवन येथे पक्ष प्रवक्ता अमित सिन्हा, ट्रेनर अमर जोशी व राजेश मल्होत्रा यांनी स्वतंत्र संग्रामात काँग्रेस नेत्यांनी केलेल्या संघर्षाला उजाळा दिला. रॅली व कार्यक्रमाला किशोर धडके, महादेव शेलार, दीपक सोनोने, सुजाता शास्त्री, शंकर आहुजा, अनिल सिन्हा, मनीषा महाकाले, अख्तर खान, बाळू पगारे, किशोर उदासी, मनोहर मनुजा, आशिष कदम, संतोष मींडे, वज्जिरुदिन खान, पवन मिरानी, रोहित ओव्हाळ, अमोल लोखंडे, चिराग फक्के आदीजन उपस्थित होते.

Web Title: Congress Kranti Jyoti Rally in Ulhasnagar on the occasion of August Revolution Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.