शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन
By admin | Published: July 10, 2015 12:01 AM2015-07-10T00:01:58+5:302015-07-10T00:01:58+5:30
शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा! अशी घोषणाबाजी करून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या
शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा! अशी घोषणाबाजी करून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने शासनाच्या विरोधात गुरुवारी मोर्चा काढला. या वेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार राज्यभर हे आंदोलन झाले. त्यानुसार, बुधवारी ठाणे शहरात माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे काँग्रेस शहर कार्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता.
या मोर्चात कल्याण शहर, ग्रामीण, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर येथील काँग्रेस अध्यक्ष उपस्थित होते. तसेच ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटी समन्वयक समितीचे सुभाष कानडे, मनोज शिंदे, नारायण पवार, मोहन तिवारी, संजय घाडीगावकर, यासीन कुरेशी, बाळकृष्ण पूर्णेकर यांच्यासह नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्यासह राजेश घोलप व इतर शहरांतील पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.