भविष्यात आघाडी जिल्हा काबीज करेल, राष्ट्रवादी काँग्रेस नेते गणेश नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 04:48 AM2018-06-15T04:48:05+5:302018-06-15T04:48:05+5:30

देशाचा पुढील पंतप्रधान कोणीही होऊ दे, पण मोदींना पहिल्यांदा हटवावे, असे मत सर्वसामान्यांसह उद्योजकांचेही आहे. पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण सर्व एकत्र आलो असतो, तर नक्की त्यांचा गणपती बाप्पा झाला असता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केले.

Congress-NCP will capture the lead district in future, NCP leader Ganesh Naik | भविष्यात आघाडी जिल्हा काबीज करेल, राष्ट्रवादी काँग्रेस नेते गणेश नाईक

भविष्यात आघाडी जिल्हा काबीज करेल, राष्ट्रवादी काँग्रेस नेते गणेश नाईक

googlenewsNext

ठाणे - देशाचा पुढील पंतप्रधान कोणीही होऊ दे, पण मोदींना पहिल्यांदा हटवावे, असे मत सर्वसामान्यांसह उद्योजकांचेही आहे. पालघर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण सर्व एकत्र आलो असतो, तर नक्की त्यांचा गणपती बाप्पा झाला असता, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केले. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी प्रकाशाच्या मार्गातून भविष्यात आघाडी जिल्हा काबीज करेल, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले.
राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीआरपी (कवाडे गट) आणि समाजवादी पार्टी या आघाडीच्या कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीचे उमेदवार नजीब मुल्ला यांची प्रचार सभेत ते बोलत होते. मध्यंतरी भारताने सहा बॉलमध्ये १८ रन बनवले. त्यावेळी शेवटच्या बॉलवर षटकार खेचून जसा भारताचा विजय झाला. त्याचप्रमाणे नजीब मुल्ला यांनी शेवटच्या बॉलवर नाही, तर एक बॉल राखून विजयी षटकार मारावा. जिल्ह्यातील आघाडीचे असलेले वैभव आपल्याच चुकांमुळे गेले आहे. त्या चुका आता सुधारल्या पाहिजेत. आता, कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीतून आघाडीचा उमेदवार मुल्ला यांचा विजय हा भविष्यातील लोकसभेपाठोपाठ असलेल्या विधानसभेसाठी प्रकाशमार्ग ठरणार आहे.
तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे जिल्ह्यात चारही खासदार निवडून येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस इच्छुक होती
कोकण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष इच्छुक होता. त्यासाठी आपण प्रयत्न केले. पण, नजीब उभा राहत असल्याने आपण माघार घेतली, असे मत काँग्रेसचे ठामपा नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी यावेळी बोलून दाखवले.

गद्दारांना धडा शिकवेल - जितेंद्र आव्हाड

२०१९ मध्ये सत्तापरिवर्तन होईल. याचे चित्र आतापर्यंत झालेल्या पोटनिवडणुकीत दिसत आहे. तसेच मतदारसंघावर कोणाचीही मक्तेदारी नसते. तसेच हे राज्य गद्दारांना धडा शिकवणारे आहे. गेल्या काही दिवसांत देशात दलितांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे त्यांच्यामध्ये अंसतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यातच, मोदींच्या हत्येच्या कटाची चर्चा करून विकासाचा मुद्दा हे सरकार बाजूला करत आहे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.

या प्रचार सभेला काँग्रेस पक्षाचे निरीक्षक यशवंत हाप्पे, माजी खासदार संजीव नाईक, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे, महेंद्र पवार, असलम खान, माजी महापौर मनोहर साळवी, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, गटनेते हणमंत जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Congress-NCP will capture the lead district in future, NCP leader Ganesh Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.