उल्हासनगरात काँग्रेसकडून पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:16+5:302021-06-09T04:50:16+5:30
उल्हासनगरातील व्हिनस चौक, १७ सेक्शन व काजल पेट्रोल पंपाबाहेर काँग्रेसचे शहाराध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ...
उल्हासनगरातील व्हिनस चौक, १७ सेक्शन व काजल पेट्रोल पंपाबाहेर काँग्रेसचे शहाराध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून हेच का अच्छे दिन, असे म्हणत लाॅलीपाॅप व गाजराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते अमित शहा, मंत्री स्मृती इराणी यांचे प्रतीकात्मक मुखवटे लावून पेट्रोल १०० पार झाल्याबद्दल ट्रॉफी देण्यात आली. आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, किशोर धडके, सुनील बहरानी, महादेव शेलार, नानिक आहुजा, महेश मिरानी, शंकर आहुजा, सुजाता शास्त्री, दीपक सोनोने, अमर जोशी, राजेश मनोत्रा, आसाराम टाक, मनीषा महांकाळे, अनिल सिन्हा, अनिल यादव, सुशील सैनी, फजल खान, सुधा जोगळेकर, रंजीत साळवे, पवन मिरानी, विशाल सोनवणे, समाधान अंभोरे, ताराचंद तायडे, संजय बदाळे, अब्दुल मज्जित इंद्रिसी, अफजल इंद्रिसी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.