कोरोना रुग्णांच्या मदतीला धावली काँग्रेस, उल्हासनगरात तक्रार निवारण कक्ष व हेल्पलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 07:03 PM2021-04-13T19:03:24+5:302021-04-13T19:04:01+5:30
शहरातील कॅम्प नं- १ ते ५ मधिल काँग्रेस पक्षाच्या स्वंयसेवकांचे नावे यावेळी जाहिर केली. काँग्रेसने स्थापन केलेली तक्रार तक्रार निवारण कक्षाची टीम महापालिका आरोग्य विभाग व डॉक्टर सोबत संपर्कात असून टीम महापालिका प्रशासनाला अप्रत्यक्ष मदत करणार आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना योग्य माहिती व मदत मिळण्यासाठी शहर काँग्रेसने कोविड तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनीं दिली. देशासह राज्यात कोरोनाचा कहर वाढला असून कोरोना रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांना इतभूत माहिती मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहे. त्यांना माहिती व मदतीचा हात देण्यासाठी शहर काँग्रेस पुढे सरसावली आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी नेहरू चौकातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात कोविड तक्रार निवारण कक्षाची स्थापना करून एक टीम तैनात केली. तसेच ७८७५५४६००० व ०२५२५२०९९९ असे दोन हेल्पलाईन नंबर आज पासून सुरू केले. नागरिकांनी तसेच कोरोना रुग्ण २४ तास सुरू राहणाऱ्या हेल्पलाईन नंबरवर माहिती व मदतीसाठी संपर्क साधण्यासाठी शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या या कार्यक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
शहरातील कॅम्प नं- १ ते ५ मधिल काँग्रेस पक्षाच्या स्वंयसेवकांचे नावे यावेळी जाहिर केली. काँग्रेसने स्थापन केलेली तक्रार तक्रार निवारण कक्षाची टीम महापालिका आरोग्य विभाग व डॉक्टर सोबत संपर्कात असून टीम महापालिका प्रशासनाला अप्रत्यक्ष मदत करणार आहे. टीमला पक्षाच्या प्रदेश टीमचे सहकार्य लाभणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. अशा कठिण प्रसंगी शहरवाशीयांनी धैर्य ठेवावे, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. असे आवाहनही साळवे यांनी केले. महराष्ट्रात होत असलेला रक्त तुटवडा लक्षात घेता, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पक्षाच्या वतीने १४ एप्रिल रोजी रेडक्रॉस हॉस्पिटल येथे सकाळी ११ ते ३ दरम्यान रक्तदानाचे शिबीराचे आयोजन केल्याची माहिती साळवे यांनी दिली.
भ्रम निर्माण करणाऱ्या पासून सावध रहा..... साळवे
देशात सर्वाधिक प्रगतिशील राज्यात काही राजकीय नेते कोरोनावर मात करण्याचा मंत्र व माहिती न देता. नागरिकांत भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सतत करीत आहेत. अश्या नेत्या पासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केले.