विनापरवानगी मोर्चाप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:49 AM2019-08-29T00:49:13+5:302019-08-29T00:49:19+5:30

जामिनावर सुटका : जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन

Congress workers arrested for defamation march | विनापरवानगी मोर्चाप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते अटकेत

विनापरवानगी मोर्चाप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते अटकेत

Next

ठाणे : पोलिसांनी परवानगी नाकारूनही ठाणे महापालिकेविरोधात मोर्चा काढणाऱ्या काँग्रेसचे नेते रवींद्रनाथ आंग्रे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बुधवारी अटक करून जामिनावर सुटका केली. त्यानंतर, मोर्चेकºयांच्या पाच जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देऊन त्यामध्ये महापालिकेतील कारभाराची लाचलुचपत विभाग व सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली. तसेच महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत साखळी उपोषणाला पोलिसांनी परवानगी दिल्याने ते ठाणे रेल्वेस्टेशनबाहेर सुरू राहील. मात्र, या दडपशाहीच्या प्रकाराबद्दल आंग्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


गेल्या पाच वर्र्षांत ठाणे महापालिकेमध्ये विविध खात्यामधील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे वृत्तपत्रांतून बाहेर आली. टीडीआर व बांधकाम टीडीआर घोटाळा, वर्तकनगर म्हाडा पुनर्विकास, शिक्षण खात्यातील गैरप्रकार, रस्तेबांधणी, घनकचरा विभागातील गैरव्यवहार, बीएसयूपी घरे वाटप, नालेसफाई घोटाळ्यास काही मोठे बिल्डर व अधिकाºयांनी संगनमत करून अनधिकृतपणे व नियम तोडून केलेल्या बांधकामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी बुधवारी काँग्रेसमार्फत ठामपावरून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, पोलिसांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कारण देऊन मोर्चास परवानगी नाकारली. तरीसुद्धा तो काढण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी आंग्रे यांच्यासह अनिल साळवी, सदानंद भोसले, नीता मगर, सुमनताई वाघ यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

हे आंदोलन काँग्रेसप्रणीत नव्हते- शिंदे
ठाणे काँग्रेस पक्षात नुकतेच प्रवेश केलेले रवींद्रनाथ आंग्रे यांनी ठामपा प्रशासनाविरु द्ध आंदोलनाचे हत्यार उगारले होते. मात्र, हे आंदोलन ठाणे काँग्रेसप्रणीत नव्हते, असे काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रक काढून स्पष्ट केले.

Web Title: Congress workers arrested for defamation march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.