‘मेट्रो मीरा-भार्इंदरला जोडा’

By admin | Published: October 26, 2015 12:45 AM2015-10-26T00:45:26+5:302015-10-26T00:45:26+5:30

अंधेरी ते दहिसर पूर्व दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच पडले असून तत्पूर्वी मुलुंड ते कासारवडवलीदरम्यानचा मेट्रो प्रकल्प घोषित केला आहे.

'Connect to Metro Meera-Bharinder' | ‘मेट्रो मीरा-भार्इंदरला जोडा’

‘मेट्रो मीरा-भार्इंदरला जोडा’

Next

भार्इंदर : अंधेरी ते दहिसर पूर्व दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच पडले असून तत्पूर्वी मुलुंड ते कासारवडवलीदरम्यानचा मेट्रो प्रकल्प घोषित केला आहे. दोन्ही मार्ग मीरा-भार्इंदर शहरांच्या वेशीवर असल्याने येथील स्थानिक प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होण्यासाठी ते घोडबंदरमार्गे शहराला जोडण्याची मागणी खा. राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मीरा-भार्इंदरकरांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे, एसटी, बेस्ट, टीएमटी व एमबीएमटी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तर खाजगी वाहनांसह रिक्षा उपलब्ध आहेत. यातील स्थानिक परिवहन सेवा (एमबीएमटी) ही शहरांतर्गत प्रवासासाठी सोयीस्कर असली तरी ती समाधानकारक नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या सेवेचे नियोजित २७ मार्ग असले तरी आजमितीस केवळ ७ ते ८ मार्गांवरच सेवा सुरू आहे. अलीकडेच येथील संतप्त प्रवाशांसह ग्रामस्थांनी बंद पाळून स्थानिक परिवहन सेवेविरोधात रोष व्यक्त केला होता. या सेवेव्यतिरिक्त उपलब्ध वाहतूक व्यवस्थासुद्धा येथील प्रवाशांसाठी तोकडी पडत असल्याने उपलब्ध वाहतुकीवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे शहरात जलवाहतुकीचा पर्याय दरम्यानच्या काळात शोधण्यात आला आहे. तत्पूर्वी मेट्रो रेल्वेचा टप्पा क्र. ७ मध्ये शहराचा समावेश असतानाही त्याला बगल देऊन राज्य शासनाने हा प्रकल्प मीरा-भार्इंदरच्या वेशीवर आणून त्याला त्यातून वगळले. तर, वेशीवर काही अंतरावरील कासारवडवली येथून मेट्रोच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे.

Web Title: 'Connect to Metro Meera-Bharinder'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.