कल्याण पूर्वेतील संतोषनगर प्रभागात गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रीम तलावाची निर्मिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 08:16 PM2020-08-22T20:16:48+5:302020-08-22T20:17:16+5:30

गुंजाई फाऊंडेशनच्या माध्यमातून विसर्जनासाठी येणाऱ्या संस्था संघटनांचा उचित सन्मान करण्यात येणार आहे.

Construction of an artificial lake for immersion of Ganesh idols in Santoshnagar ward, east of Kalyan | कल्याण पूर्वेतील संतोषनगर प्रभागात गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रीम तलावाची निर्मिती 

कल्याण पूर्वेतील संतोषनगर प्रभागात गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रीम तलावाची निर्मिती 

googlenewsNext

कल्याण : गणेश विसर्जन सोहळ्या दरम्यानही कोरोणा चा संसर्ग  नये टाळण्यासाठी संतोष नगर प्रभाग क्र . ८८ चे शिवसेना नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य महेश दशरथ गायकवाड यांनी कल्पाण पूर्व परिसरातील गणेश भक्तांसाठी आपल्या प्रभागात 'कोरोना प्रादुर्भाव मुक्त ' अशा गणेश विसर्जन कृत्रीम तलावाची निर्मिती केली आहे. या गणेश विसर्जन सोहळ्या दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विशेष अशा उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहकार्याने जरीमरी मंदीरापासुन काही अंतरावर निर्माण करण्यात आलेल्या या भव्य कृत्रीम तलावात गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तांची कोरोना संसर्गापासुन अलिप्तता रहावी या साठी या तलावाजवळ मातोश्री गुंजाई फाऊंडेशनचे ५० हून अधिक स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत .या तलावात विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि संस्था संघटनेच्या प्रतिनिधींना सोशल डिस्टेसिंग बाबतचे महत्व पटवून देण्यात येणार असून या ठिकाणी गुंजाई फाऊंडेशनच्या माध्यमातून विसर्जनासाठी येणाऱ्या संस्था संघटनांचा उचित सन्मान करण्यात येणार आहे.

गेल्या तिन वर्षांपासून जरीमरी सेवा मंडळाचा गणेश विसर्जन तलाव गणेश मुर्ती विसर्जनासाठी बंद करण्यात आल्यानंतर परिसरातील गणेश भक्तांची गणेश मुर्ती विसर्जनाबाबत निर्माण झालेली गैरसोय दुर करण्यासाठी महेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने या कृत्रीत तलावाची निर्मिती करण्यात येत आहे . कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिचा विचार करता शासनाच्या सर्व नियम आणि अटी शर्तींचे कारेकोरपणे पालन करीत या तलावाचा जास्तीत जास्त गणेश भक्तांनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन मातोश्री गुंजाई फाऊंडेशनच्या वतीने  गणेश भक्तांना केले आहे.

Web Title: Construction of an artificial lake for immersion of Ganesh idols in Santoshnagar ward, east of Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.