अंबरनाथच्या निसर्ग ग्रीन्स सोसायटीत बांधकाम साहित्य गुदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:38 AM2021-03-28T04:38:18+5:302021-03-28T04:38:18+5:30
शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास निसर्ग ग्रीन्स या ग्रुपचा संकुलाच्या आवारात बांधकामासाठी मागविलेल्या साहित्याला लागलेली आग क्षणात वाढल्याने सोसायटीमधील ...
शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास निसर्ग ग्रीन्स या ग्रुपचा संकुलाच्या आवारात बांधकामासाठी मागविलेल्या साहित्याला लागलेली आग क्षणात वाढल्याने सोसायटीमधील अग्निशमन यंत्रणेला ती आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. त्यामुळे अंबरनाथ अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, यावेळी सोसायटीची अग्निरोधक यंत्रणा बंद असल्याचे अग्निशमन दलाच्या लक्षात आले. त्यामुळे आग विझवण्यात अडथळे निर्माण झाले. अखेर एमआयडीसी अग्निशमन दलाची मदत मागवून ही आग विझवण्यात आली. या सोसायटीत १८ मजल्यांच्या इमारती असून, तितक्या उंच शिड्या अग्निशमन दलाकडे नसल्याने या सोसायटीत अग्निरोधक यंत्रणा बसवली आहे. मात्र, ती अशा दुर्घटनांच्या वेळीच बंद असेल तर तिचा काय उपयोग, असा सवाल यानंतर उपस्थित झाला आहे.
----------------------------------------------